19 January 2018

News Flash

…म्हणून जमिनीवर बसून जेवणे फायद्याचे!

जाणून घ्यायला हवे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 12:32 PM

प्रातिनिधिक छायाचित्र

सध्या धकाधकीची जीवनशैली आणि धावपळ यामुळे जेवण उरकण्याकडे अनेकांचा कल दिसतो. ऑफीसमध्ये तर टेबलवर बसूनच जेवावे लागते. मात्र घरी असतानाही अनेक जण जेवण्यासाठी टेबल-खुर्चीचा वापर करतात. मात्र जमिनीवर बसून जेवणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. जेवायला जमिनीवर न बसण्यासारखे जीवनशैलीतील हे बदल आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत. सुरुवातीला अगदी लहान वाटणाऱ्या या गोष्टी भविष्यात गंभीर आजारांचे महत्त्वाचे कारण ठरु शकतात, त्यामुळे वेळीच काळजी घेतलेली चांगली. पाहूयात काय आहेत जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे…

१. वजन नियंत्रित राहते

जमिनीवर बसताना आपण मांडी घालून जेवतो. मांडी घातल्याने आपले पोट भरले आहे याची जाणीव आपल्याला वेळीच होते. त्यामुळे भूकेपेक्षा अतिरिक्त खाल्ले जात नाही. मात्र खुर्चीत बसल्यावर आपण नकळत जास्त खातो. त्यामुळे जेवायला खाली बसल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

२. सांधेदुखीवर फायदेशीर

पद्मासनात तसेच मांडी घालून जेवायला बसल्याने केवळ पचनक्रियाच सुधारते असे नाही तर सांधे लवचिक होण्यास मदत होते. ही स्थिती शरीरासाठी फायदेशीर असते. त्यामुळे भविष्यात सांधेदुखीपासून आपली सुटका होऊ शकते.

३. पचनक्रिया सुधारते

जमिनीवर बसून जेवल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. जमिनीवर बसून जेवताना आपण मागेपुढे होत असतो. त्यामुळे पोटातील मांसपेशी सक्रिय होतात आणि अन्नपचनाची क्रिया सुलभ होते.

४. जेवणावर लक्ष असते

जमिनीवर बसून जेवल्याने आपले लक्ष केवळ जेवणावर राहते. त्यामुळे आपण शांतपणे आपल्याला हवे ते पदार्थ खाऊ शकतो. हेच आपण टेबलवर बसलो तर आपले लक्ष आजूबाजूला जास्त आणि जेवणावर कमी राहते.

५. हृदय मजबूत होण्यास मदत

जमिनीवर बसल्यामुळे रक्ताभिसरण क्रिया चांगली होते. रक्ताभिसरण योग्य पद्धतीने झाल्यामुळे हृदय पचनक्रिया चांगली होण्यास मदत करते. खुर्चीवर बसल्यावर रक्ताभिसरण पायापर्यंतच होते. जेवण करताना असे होणे चांगले नाही. त्यामुळे जमिनीवर बसून जेवणे कधीही चांगलेच.

First Published on October 4, 2017 12:32 pm

Web Title: taking meal by seating on floor is useful for good health
  1. No Comments.