सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीनं आपली ६ पैसे कॅशबॅकच्या ऑफरची मुदत ३१ मे पर्यंत वाढवली आहे. कंपनीनं लँडलाईनवर कॉल करणाऱ्या ग्राहकांसाठी गेल्या वर्षी ही ऑफर लाँच केली होती. याअंतर्गत वॉईस कॉलच्या मोबदल्यात कंपनीकडून ६ पैशांचा फायदा देण्यात येत होता. जाणून घेऊ ही ऑफर कशी अॅक्टिव्हेट करता येईल.

या ऑफरअंतर्गत एखाद्या ग्राहकानं पाच मिनिटांपेक्षा अधिक कालावधीसाठी लँडलाईनवर कॉल केला तर त्या व्यक्तीला ६ पैशांचा कॅशबॅक देण्यात येत होता. यासाठी ‘ACT 6 paisa’ असा मेसेज टाईप करून तो 9478053334 या क्रमांकावर पाठवावा लागले. ही कॅशबॅक ऑफर बीएसएनएल वायरलाईन, ब्रॉडबँड आणि फायबर टू होम ग्राहकांसाठीदेखील उपलब्ध आहे.

कंपनीनं आपल्या तामिळनाडू बीएसएनएलच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. ही ऑफर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच करण्यात आली होती. रिलायन्स जिओनं ज्यावेळी आपल्या ग्राहकांकडून ६ पैसे प्रति मिनिट दर आकारण्यास सुरूवात केली त्यावेळीच बीएसएनएलनं ही ऑफर लाँच केली होती.

रिचार्चवर ४ टक्क्यांची सुट
बीएसएनएलची ही कॅशबॅक ऑफर ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे आणि ग्राहकांकडून याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. यापूर्वीही कंपनीनं अनेकदा ही ऑफर काही कालावधीसाठी वाढवली होती. तर दुसरीकडे लॉकडाउनमध्ये ग्राहकांच्या मदतीसाठी बीएसएनएल कंपनीनं रिचार्ज अमाऊंटवर ४ टक्क्यांची सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्यांचा बीएसएनएल अकाऊंट रिचार्ज करणाऱ्याला ही सुट देण्यात येणार आहे.