प्रीव्हेल इलेक्ट्रिक या ऑटोमोटिव्ह सोल्युशन देणाऱ्या स्टार्टअप  कंपनीने इलाइट, फाइनेस आणि वुल्फरी या तीन प्रीमियम मॉडेल स्कूटर लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

’ इलाइट : ही स्कूटर कमाल २०० किलो वजनाकरिता ताशी ८० किमीचा सर्वाेच्च वेग देते. लिथियम-आयन बॅटरी, बदलता येणारे बॅटरी पर्याय असलेली ही स्कूटर एका चार्जवर ११० किलोमीटरपर्यंत जाऊ  शकते. एकदा बॅटरी पूर्ण संपल्यावर ती ४ तासांत पूर्णपणे चार्ज होऊ  शकते. या एलसीडी स्क्रीन असून ती प्रामुख्याने दिशादर्शन, नियंत्रण आणि मनोरंजनाच्या उद्देशासाठी वापरली जाते. ही स्कूटर १२९,९९९ रुपयांत उपलब्ध आहे.

’ फाइनेस : ही स्कूटर कमाल २०० किलो वजनासाठी ताशी ६० किमीचा अव्वल वेग देते. लिथियम-आयन बॅटरीद्वारे स्कूटर सिंगल चार्जमध्ये ११० किमीपर्यंत जाऊ शकते. ४ तासांत ती संपूर्ण चार्ज होते. ही स्कूटर ९९,९९९ रुपयांत उपलब्ध आहे.

’ वुल्फरी : ही स्कूटर  कमाल २०० किलो वजनासाठी ताशी ५० किमी एवढा सर्वाधिक वेग देते. लिथियम बॅटरी असलेली ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर ११० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. पूर्णपणे चार्ज होण्यासाठी हे मॉडेल ४ तास घेते. ही स्कूटर ८९,९९९ रुपयांत उपलब्ध आहे.

या स्कूटर्स ग्राहकांना मोबाइल फोन चार्ज करण्याचीही सुविधा पुरवतात.