01 March 2021

News Flash

टिकटॉक निर्मात्या कंपनीचा मोठा निर्णय, भारतातून दोन व्हिडीओ अ‍ॅप बंद करण्याची घोषणा

विगो अ‍ॅप भारतातून बंद करण्याची घोषणा, युजर्सना टिकटॉक डाउनलोड करण्याचा सल्ला

टिकटॉप अ‍ॅपची निर्मिती करणारी कंपनी बाइटडान्सने (ByteDance) भारतातील आपले दोन व्हिडीओ अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत भारतातून विगो व्हिडीओ (Vigo Video) आणि विगो लाइट (Vigo Lite) अ‍ॅप बंद करण्यात येणार आहेत. कंपनीने विगो युजर्सना टिकटॉक डाउनलोड करुन आपले व्हिडीओ टिकटॉकवर एक्स्पोर्ट करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीने विगो व्हिडीओच्या वेबसाइटवर ही घोषणा केली आहे. विगो युजर्स अ‍ॅप बंद होण्याआधी म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत आपले व्हिडीओ टिकटॉकवर एक्स्पोर्ट करु शकतात.

या देशांमध्ये बंद झालं आहे अ‍ॅप
हे अ‍ॅप आधीच ब्राझिल आणि मध्य पूर्व देशांमध्ये बंद करण्यात आलं आहे. हे अ‍ॅप बंद करुन सर्व लक्ष आणि एनर्जी इतर व्यवसायांवर केंद्रीत करणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.

२०१७ मध्ये आलं होतं विगो व्हिडीओ अ‍ॅप
कंपनीचं हे व्हिडीओ मेकिंग अ‍ॅप २०१७ मध्ये लॉन्च झालं होतं. या प्लॅटफॉर्मवर १५ सेंकंदांपर्यंत व्हिडीओ बनवले जाऊ शकतात. या अ‍ॅपवर डान्स, फूड, स्टंट, ब्युटी, आर्ट, कॉमेडी, म्युजिक अशा वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडीओ बनवले जाऊ शकत होते. या अ‍ॅपला १०० मिलिअनपेक्षा जास्त डाऊनलोड आहेत.

टिकटॉकक सर्वात जास्त पॉप्यूलर
भारतात व्हिडीओ मेकिंगसाठी टिकटॉकला तरुणाईची सर्वात जास्त पसंती आहे. टिकटॉकच्या तुलनेत या अ‍ॅपला इतका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. भारतात या अ‍ॅपचे चार मिलिअर अॅक्टिव्ह युजर्स असताना याच्या लाइट व्हर्जनचे १.५ मिलिअन अॅक्टिव्ह युजर्स आहेत.

टिकटॉकचे १०० कोटींहून जास्त डाउनलोड
एप्रिल २०२० मध्ये टिकटॉकने १०० कोटींचाही आकडा पार केला. शॉर्ट व्हिडीओ फॉरमॅटमुळे टिकटॉकला लोकांची पसंती मिळत आहे. यामध्ये युजर क्रिएटिव्ह व्हिडीओ शूट करुन लोकांचं मनोरंजन करत असतात. लॉकडाउनमध्ये टिकटॉक डाउनलोडचं प्रमाण वाढलं आहे. तर दुसरीकडे काही वादग्रस्त व्हिडीओंमुळे फटकाही सहन करावा लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 8:54 pm

Web Title: tiktok makers bytedance is shutting down its popular vigo video app in india sgy 87
Next Stories
1 ‘होंडा’ने परत मागवल्या 65 हजारांहून जास्त कार; होंडा सिटी, Amaze, Jazz चा समावेश
2 चार रिअर कॅमेऱ्यांसह 5,000mAh बॅटरी; Oppo A52 चा ‘या’ तारखेला ‘सेल’
3 आता सहजसोप्या पद्धतीने घरीच करता येणार हर्बल बॉडीवॉश!
Just Now!
X