03 March 2021

News Flash

टोयोटा-मारुतीची संयुक्त निर्मिती, शानदार Glanza भारतात लाँच

'टोयोटा'ची 'बलेनो'! संयुक्त करारानुसार निर्मिती केलेली पहिलीच कार, किंमत...

टोयोटा कंपनीने हॅचबॅक प्रकारातील आपली ‘ग्लांझा’ ही नवीन कार भारतीय बाजारात लाँच केली आहे. वैशिष्ट्य म्हणजे टोयोटा आणि मारुती सुझुकी यांनी संयुक्त करारानुसार निर्मिती केलेली ही पहिलीच कार आहे.

मारूती सुझुकीच्या ‘बलेनो’ या लोकप्रिय मॉडेलनुसार ‘ग्लांझा’चे डिझाइन करण्यात आले आहे. यातील बहुतांश फीचर्स हे बलेनोसारखेच आहेत. मात्र, कारच्या बाह्यांगात काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. तर अन्य फिचर्सचा अंतर्भावदेखील करण्यात आलेला आहे. दोन्ही कारचा आकार आणि बूट स्पेस यात अधिक फरक नाहीये. मात्र, ‘ग्लांझा’मध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. चाक आणि टेलगेटवर देण्यात आलेल्या बॅचमुळे ही कार बलेनोपेक्षा वेगळी ठरते. काही महिन्यांपूर्वीच टोयोटा मोटर्स आणि मारूती सुझुकीने सहकार्याचा करार केल्याची घोषणा केली होती. दोन्ही कंपन्या संयुक्तरित्या काही मॉडेल्स तयार करणार असल्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली होती. त्यानुसार ‘ग्लांझा’ची निर्मिती करण्यात आली आहे.

जी आणि व्ही या दोन मालिकांमध्ये ही कार सादर करण्यात आली असून यातील व्ही ही मालिका प्रिमीयम अर्थात उच्च दर्जाची आहे. यामध्ये डे-टाईम रनींग लँप्स, क्लायमेट कंट्रोल, इंफोटेनमेंट सिस्टिम, रिव्हर्स पार्कींग सेंसर, अलॉय व्हील्स, एलईडी हेड आणि टेल लँप्स, इबीडीयुक्त एबीएस प्रणाली, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, अद्ययावत ग्रील अशा फिचर्सचा समावेश आहे. ‘जी’ व्हेरिएंट्समध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन माइल्ड हायब्रिड इंजिन आहे. ‘व्ही’ आणि ‘जी’ दोन व्हेरिएंट देखील बलेनो कारच्या टॉप व्हेरिएंट्स जेटा आणि अल्फावर आधारित आहेत. ग्लांझामध्ये के12बी हे 1.2 लीटर क्षमतेचे आणि के12ड्युअल जेट अशा दोन पेट्रोल इंजिनाचे पर्याय असून हे दोन्ही इंजिन बीएस-6 या मानकानुसार तयार करण्यात आलेले आहेत. याला 5 स्पीड मॅन्युअल तसेच सीव्हीटी ट्रांसमिशनचे पर्यायदेखील आहेत. टोयोटाने मारुती सुझुकीची स्मार्ट-प्ले इंफोटेनमेंट सिस्टिम रिब्रॅंडींग करून त्याला ‘स्मार्ट प्ले-कास्ट’ नाव दिले आहे. या इंफोटेनमेंट सिस्टिममध्ये अॅन्ड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले आणि व्हॉइस कमांड यांसारखी सुविधा आहे. बलेनोचे सुझुकी कनेक्ट अॅप हे मायलेज, लाइव्ह व्हेइक अलर्ट यांसारखीही फीचर्स आहेत. Glanzaनंतर टोयोटा मारुती सुझुकी अर्टिगा, विटार ब्रेझा आणि सियाजचे क्रॉस-बॅज्ड व्हर्जन आणू शकते.

किंमत –

  • ‘ग्लांझा’ कारची एक्स शोरुम किंमत 7.22 लाख रुपये आहे.
  • जी एमटी स्मार्ट हायब्रीड (7.22 लाख रुपये, एक्स शोरुम )
  • जी सीव्हीटी (8.30 लाख रुपये, एक्स शोरुम)
  • व्ही एमटी (7.58 लाख रुपये, एक्स शोरुम)
  • व्ही सिव्हीटी (8.90 लाख रुपये, एक्स शोरुम)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 4:21 pm

Web Title: toyota glanza launched in india know price and all specifications sas 89
Next Stories
1 5 कॅमेऱ्यांचा Honor 20 प्रो आणि Honor 20 भारतात लाँच
2 आली नवीन ‘इ-स्कूटर’, एकदा चार्ज केल्यास 90 किमीचा प्रवास
3 चार कॅमेऱ्यांसह आला Infinix Hot 7 Pro, किंमत 10 हजारांपेक्षाही कमी
Just Now!
X