– गौरीता माधव मांजरेकर

सुख म्हणजे काय असते, असे जर कुणी विचारले तर आपण ढोबळपणे सुखाची व्याख्या अशी करतो की ज्या परिस्थिती ,व्यक्ती आणि गोष्टी मनाला सुखावून जातात आणि आनंदाचा अनुभव देतात, ते म्हणजे ‘सुख’. ज्या परिस्थिती, व्यक्ती आणि गोष्टी मानसिक क्लेश किंवा चिंतेच्या कारण होतात त्यांना आपण ‘दुःख’ म्हणतो. सुख आणि दुःख हे जीवनरूपी नाण्याच्या दोन बाजू आहेत असे आपण वडीलधाऱ्यांच्या तोंडून सतत ऐकत असतो आणि आपण त्यावर विश्वास ही ठेवतो. खरं तर सुख आणि दुःख अनुभवणे ही मानसिक प्रक्रिया आहे. जीवनातील इतर प्रक्रिया जसे खाणे, पिणे यासारख्या शारीरिक क्रियांचा समतोल बिघडला तर जसे आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात. तसेच सुख आणि दुःख यांचा अतिरेक झाला तर मानसिक संतुलन बिघडून मानसिक समस्या निर्माण होतात.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…

सुरुवातीला याचे स्वरूप छोटीशी निराशा असते. नंतर सतत येणाऱ्या निराशेचे रूपांतर नैराश्यात व त्यानंतर त्याचे उग्र स्वरूप डिप्रेशन/उदासीनता पाहावयास मिळते. जीवनात अनुभवास येणाऱ्या निराशेस नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या आंतरिक सुखाची गुरुकिल्ली ज्या सुखाच्या सदराआड दडली आहेत त्या सदरामागची पाच सुखाची रहस्ये जाणून घेऊया.

१- परिस्थिती आणि व्यक्ती यांचा स्वीकार जसे आहे तसे करा.

अनेकदा आपल्या दुःखाचे किंवा अपयशाचे खापर दुसरी व्यक्ती किंवा बाह्य परिस्थितीवर लादले जाते. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीपासून किंवा परिस्थितीपासून अपेक्षा ठेवतो व ती पूर्ण झाली नाही तर आपल्या वाटेला छोटी निराशा येते. मग आपल्या वर्तनातून चिडचिड, मानसिक त्रागा, राग प्रगट होतो. ही निराशेची सौम्य रूपे कधी नैराश्याची पायरी ओलांडून डिप्रेशनच्या अवस्थेपर्यंत पोहोचतात ते कळतही नाही.

या सर्वांवर एकच उपाय आहे व तो म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीचा जसे आहे तसे स्वीकार करणे. नकारात्मक परिस्थिती आणि नकारात्मक व्यक्ती ज्या तुमच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य नाहीत त्यांच्यात आणि आपल्यात लक्ष्मणरेषा अथवा बाउंड्री घालणे तेवढेच गरजेचे आहे.

एखादी परिस्थिती किंवा व्यक्ती यांचा स्वीकार केला गेला की त्या परिस्थितीवर मात करून विजय प्राप्त करण्यासाठी आवश्यक ‘विनिंग अटीट्युड किंवा जिंकण्याचा दृष्टिकोन’ तयार करता येतो. थोडक्यात, आपले व्यक्तिमत्व केवळ एखाद्या समस्येवर निष्फळ चर्चा करणारे प्रॉब्लेम ओरिएंटेड न होता समस्येवर योग्य निराकरण किंवा सोल्युशन शोधणारे सोल्युशन ओरिएंटेड बनते.

२- नकारात्मक परिस्थितीचा सकारात्मक विचार करा.

लॉकडाउनमुळे जगभरात अनेक व्यक्तींच्या वाटेला नैराश्य आले आहे. जर लॉकडाउनमध्ये आपण स्वतःला वेगवेगळ्या अॅक्टीव्हीटीज किंवा छंदामध्ये व्यस्त ठेऊन स्वतःचा “लॉकडाऊन टाइम” सत्कारणी लावला तर यावर मात करता येऊ शकते. मराठी किंवा हिंदी सिनेमासृष्टीमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपला वेळ गार्डनिंग, डान्सिंग, किंवा कुकिंग अथवा आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर आनंदात घालवितात असे त्यांच्या इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या पोस्टवरून कळते.

मुळात नकारात्मक परिस्थितीत स्वतःच्या आंतरिक आनंदाचा शोध घेता आले तर लॉकडाउनचा कालावधी सहजपणे व्यतीत करता येतो. जर आपण विद्यार्थी किंवा बिझनेस करणारे असाल तर आपल्या करियरसाठी आवश्यक स्किल किंवा कौशल्ये ऑनलाइन शिकून आपण हा वेळ सत्कारणी लावू शकता. स्वतःचा बायोडाटा अपडेट करण्याच्या सुवर्णसंधीचा फायदा लॉकडाउनच्या काळात घेण्यात शहाणपणा आहे.

३- स्वतःवर प्रेम करा

स्वतःच्या चांगल्या मानसिक आरोग्यासाठी स्वतःची काळजी आणि स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. अनेकदा आपण स्वतःपेक्षा आपले नातेवाईक किंवा मुले यांच्यासाठी वेळेचे नियोजन करतो. पण स्वतःचा “मी-टाइम” विसरून जातो. यासाठी दिवसातून काही मिनिटे स्वतःसाठी म्हणजे स्वतःला आवडणारे नाटक किंवा चित्रपट बघण्यासाठी किंवा आवडीचे संगीत ऐकण्यासाठी किंवा आवडीचे पुस्तक वाचण्यासाठी काढून ठेवणे गरजेचे आहे. ह्या “मी-टाइम” मध्ये स्वतःला आवडणाऱ्या कुठल्याही उपक्रमामध्ये सहभागी होऊन आनंद मिळविणे हा उद्देश्य ठेवला तर जीवनातील प्रत्येक दिवस “सुखी दिवस” होईल.

४- वेळेचे नियोजन ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे

सकाळी उठल्यापासून आपण वेळेचे नियोजन कसे करतो यावर आपल्या दिवसाच्या सुखाचे गणित अवलंबून असते. आपल्या संस्कृतीने ब्राह्म मुहुर्त ही उठण्याची उत्तम वेळ सांगितली आहे. साधारण सकाळी सूर्योदयापूर्वी एक तास आधी उठल्यामुळे दिवसास आवश्यक ऊर्जा आपल्याला मिळते आणि दिवस उत्साहात आणि कार्यशील जातो. जर दिवसाचे वर्गीकरण तीन भागात केले आणि प्रत्येक भागात तीन महत्वाचे गोल्स किंवा ध्येय ठरविली आणि ती पूर्ण करण्यासाठी आपली मानसिक आणि शारीरिक ऊर्जा एकवटली तर दिवस सुपर प्रोडक्टीव्ह होतो. ज्यामुळे तुमची मानसिक ऊर्जा वाढून आंतरिक आनंदाचा अनुभव घेता येतो. “टू डू लिस्ट ” जर लिहिण्याची नियमित सवय ठेवली तर दिवसाच्या शेवटी स्वतःच्या कार्यशीलतेचा आढावा घेणे सोपे होते.

५- ‘थँक्यू’ बोला किंवा आभार व्यक्त करायला शिका.

प्रत्येक दिवशी प्रत्येक व्यक्तीने ज्या दिव्य शक्तीवर आपली श्रद्धा आहे तिचे आभार मानणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जेवणाच्या टेबलावर जेवण सुरू करण्यापूर्वी त्या दिव्य शक्तीचे स्मरण करून आणि त्या सर्व व्यक्तीं ज्यामुळे आपल्याला जेवण प्राप्त झाले आहे जसे शेतकरी, आपल्याला धान्य पोहचविणारा किराणा दुकानदार,जेवण शिजवणारी आई या सर्वांचे आभार किंवा त्यांना “थँक्यू ” म्हटल्यामुळे सामाजिक कृतज्ञता जोपासली जाते. आपण प्रत्येक दिवशी तीन गोष्टींसाठी देवाला “थँक्यू ” नियमित म्हणायची सवय लावली तर आपल्यातील अहंकाराचा समतोल साधला जातो.

gauritamanjrekar9@gmail.com