तुमचा मूड फ्रेश ठेवण्यासाठी ‘या’ सुगंधित अत्तरांचा करा वापर, याने तुम्ही राहाल आनंदित! चिंता किंवा तणाव आपल्या आरोग्यवर खूप परिणाम करते. धावपळीच्या युगात तणाव ही एक समस्या निर्माण झाली आहे.या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी अनेकजण बाहेर फिरायला जातात. सिनेमा पाहायला जातात. मात्र करोनामुळे हे सर्व करणे शक्य नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमचा मूड आनंदी करण्यासाठी परफ्युम (Perfume) किंवा अत्तरचा वापर करू शकता. कारण परफ्युम (Perfume) किंवा अत्तरच्या सुगंधाने तुमचा मूड तुम्ही बूस्ट करू शकतात. या सुगंधाने तुमच्या भावनांवर देखील परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला प्रसन्न वाटू शकते. चला तर मग जाणून घेऊयात की कोणत्या सुगंधांच्या मदतीने तुमचा मूड तुम्ही चांगला करू शकतात.

चंदनचा सुगंध

चंदन या सेंटचा सुगंध अतिशय मनमोहक आणि तजेलदार आहे. याच्या सुगंधाने तुमचे मन संतुलित राहते. तुम्ही जर कामावर जाताना या चंदनाचा अत्तर किंवा परफ्यूम लावून गेल्यावर तुम्ही करत असलेल्या कार्यावर लक्ष केंद्रीत कराल आणि तुमचं काम छान होईल. तसेच मेडीटेशन करताना या सुगंधाचा वापर करा. याने मन अगदी प्रसन्न राहते.

व्हॅनिला फ्रेगरेंस

व्हॅनिलाचा सुगंध घेतला की तुम्हाला ताजेतवाने आणि आरामदायक वाटू शकते. या सुगंधात थोडासा गोडपणा आहे. ज्यामुळे तुमचा मूड अगदी फ्रेश होतो. तुम्ही जर एखाद्या खास व्यक्तीबरोबर डेटला जात असाल तेव्हा नक्कीच व्हॅनिलाचा परफ्यूम (Perfume) वापरा.

बेर्गमॉट फ्रेगरेंस (गंध)

तुम्हाला जर उदास वाटू लागले असेल आणि थकवा जाणवत असेल तर बेर्गमॉटचा फ्रेगरेंस तुम्हाला फ्रेश करण्यास मदत करू शकेल.ही एक संत्र्याची प्रजाती आहे. हिवाळाच्या हंगामात येणारा हे फळ चवीला अगदी कडू आणि आंबट आहे. मात्र याचा फ्रेगरेंस गोडपणा आणि थोडासा स्ट्रॉंग आहे. ज्यामुळे तुम्हाला एकदम ताजे अगदी फ्रेश वाटते.

पांढरी कस्तुरी

करोना काळात वर्क फ्रॉम होम करून कंटाळा आला असेल तर काम करताना मूड चांगला ठेवण्यासाठी तुम्ही पांढरी कस्तुरी या अत्तरचा वापर अगदी सिंथेटिक वर्जनमध्ये वापर करावा. तुम्हाला जर एंजायटी हा मानसिक त्रास असेल तर तुम्ही या अत्तरचा नक्कीच वापर करा.

(टीप:- वरील टिप्सचा वापर करताना यातील जाणकारांचा अथवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)