जेवल्यानंतर लगेच झोप येणे ही अतिशय सामान्य सवय आहे. मात्र ही सवय आरोग्यासाठी अतिशय धोक्याची ठरु शकते. त्यामुळे ज्यांना अशी सवय असेल त्यांनी ती टाळायला हवी. सध्या स्पर्धेच्या जगात सगळेच धावपळीत असतात, त्याचा परिणाम म्हणजे अनेकजण सकाळचा ब्रेकफास्ट करणे टाळतात. अनेकदा केवळ रात्रीच अनेकांना मनापासून जेवण्यासाठी शांत वेळ मिळतो. रात्रीच्यावेळी चरबी वाढविणारे आणि कार्बोहायड्रेटस असणारे पदार्थ खाल्ल्यावर लगेच झोपणे अतिशय हानिकारक असते. ज्यांना जेवणानंतर लगेचच झोपण्याची सवय असते त्यांची पचनक्रिया योग्य पद्धतीने होत नाही. तसेच या लोकांना याशिवायही आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात, कोणत्या ते पाहूया…

१. छातीत जळजळ होणे

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण

जेवण झाल्यानंतर व्यक्तीचे शरीर पचनक्रियेसाठी तयार होते. खाल्लेल्या अन्नाचे पचन शरीरातील विविध अवयवांमार्फत होत असते. यासाठी शरीरात काही रसायने निर्माण होतात. मात्र जेवल्यानंतर तुम्ही लगेच जेवायला गेलात तर या रसायनांमुळे जळजळ होते. त्यामुळे छातीत आणि पोटात आग झाल्यासारखे वाटते. याशिवाय इतरही समस्या निर्माण होतात.

२. झोपेचे वेळापत्रक बदलते

जेवण झाल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुरु असते. त्यामुळे शरीर काही काळ शांत नसते. अशावेळी झोपल्यास सुरुवातीला शांत झोप आल्यासारखे वाटते. मात्र ही झोप तात्पुरत्या स्वरुपाची असते. रात्रभरा लागणारी झोप गाढ आणि शांत नसते. त्यामुळे झोपेत अडथळे येतात आणि शारीरिक स्वास्थ्य राखणे अवघड होते.

३. शरीरातील साखरेची पातळी वाढते

मधुमेह असणारे लोक जेवण झाल्याझाल्या लगेचच झोपत असतील तर त्याच्या रक्तातील साखरेच्या पातळीत चढउतार होतात. त्यामुळे मधुमेहींनी जेवणानंतर किमान काही शारीरिक क्रिया करणे गरजेचे आहे. अन्यथा रक्तातील स्खरेचे प्रमाण वाढते जे आरोग्यासाठी धोक्याचे लक्षण असते.

४. पचनक्रियेत अडचणी येतात

आपण झोपतो तेव्हा गुरुत्वाकर्षण होऊ शकत नाही. पचन होण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची आवश्यकता असते. उभे असल्यास ही क्रिया योग्य पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच झोपणे टाळावे. असे वारंवार झाल्यास पचनक्रिया कायमसाठी बिघडते आणि त्याचा परिणाम म्हणजे हृदयाच्या अडचणीही निर्माण होऊ शकतात.