News Flash

Twitter वर पुन्हा सुरू झालं ‘ब्लू टिक व्हेरिफिकेशन’, तीन वर्षांनी झालं पुनरागमन; जाणून घ्या डिटेल्स

जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा ब्लू टिक व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू...

लोकप्रिय माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने आपल्या प्लॅटफॉर्मवरील व्हेरिफिकेशन प्रोग्राम पुन्हा सुरू केलाय. २२ जानेवारीपासून ट्विटरवर पुन्हा एकदा पब्लिक व्हेरिफिकेशनला सुरूवात झाली आहे. २०१७ मध्ये कंपनीने व्हेरिफिकेशन प्रोग्राम बंद केला होता, आता तीन वर्षानंतर पुन्हा एकदा याला सुरूवात झाली आहे.

ट्विटर अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी पात्रता :-
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं अकाउंट सक्रीय असेल त्यांनाच ब्लू-टिक मिळेल. कंपनीकडून सुरूवातीला सहा प्रकारच्या युजर्सना ब्लू टिक मिळेल, अर्थात त्यांचं अकाउंट व्हेरिफिकेशन होईल. यामध्ये सरकार (राज्य किंवा केंद्र) कंपनी, ब्रँड्स, नॉन प्रॉफिट ऑर्गनायजेशन, पत्रकार आणि न्यूज संस्था, एंटरटेन्मेंट, स्पोर्ट्स, गेमिंग, अॅक्टिव्हिस्ट, ऑर्गनायझेशन आणि इतर प्रभावशाली व्यक्तींचा समावेश असेल. ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत त्या अकाउंट्सनाही ब्लू-टिक मिळू शकतं.

आणखी वाचा- Google चा मोठा निर्णय, ‘या’ अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर नाही काम करणार व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप

कोणाचं व्हेरिफिकेशन हटवणार :-
तर, अनेक व्हेरिफाईड अकाउंट्स जे आता ब्लू-टिकसाठी पात्र नाहीयेत किंवा असे युजर जे यापूर्वी सरकारचा हिस्सा होते मात्र, आता सरकारसोबत संबंध नाहीये त्यांचे ब्लू टिक व्हेरिफिकेशन काढून टाकण्यात येणार आहे. तसेच ज्यांचा मृत्यू झालाय अशा व्यक्तींच्या अकाउंट्सचेही ब्लू टिक व्हेरिफिकेशन काढण्यात येईल. शिवाय वारंवार ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचं, किंवा वादग्रस्त आणि तेढ निर्माण होईल असे ट्विट करणाऱ्यांच्या अकाउंटचही ब्लू-टिक हटवलं जाणार आहे.

आणखी वाचा- लपून-छपून Porn बघणाऱ्यांचं आता काही खरं नाही…! प्रसिद्ध वेबसाइटचा डेटा गेला चोरीला

कसा करायचा अर्ज ः
ट्विटरच्या वेबसाइट किंवा अॅपमध्ये अकाउंट सेटिंग्समध्ये जाऊन रिक्वेस्ट व्हेरिफिकेशन पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 2:03 pm

Web Title: twitter relaunches profile verification process blue tick verification sas 89
Next Stories
1 आजपासून Aadhaar प्रमाणे वोटर कार्डची पीडीएफ कॉपीही करता येणार डाउनलोड, जाणून घ्या प्रक्रिया
2 लपून-छपून Porn बघणाऱ्यांचं आता काही खरं नाही…! प्रसिद्ध वेबसाइटचा डेटा गेला चोरीला
3 Poco च्या स्वस्त स्मार्टफोनची भारतात ‘डिमांड’, विक्रीचा आकडा 10 लाखांपार
Just Now!
X