25 November 2020

News Flash

USB Condom ची मागणी का सातत्याने वाढतेय?

प्रवासात उपयोगी ठरणाऱ्या USB Condom च्या मागणीत झपाट्याने वाढ

USB Condom हे नाव ऐकूनच हादरा बसेल. पण, अशा प्रकारचं नवं प्रोडक्ट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. तुम्हाला ते प्रवासात कामाला येईल. तुमची कोणतीही गोष्ट ‘लीक’ होणार नाही. हे प्रोडक्ट आहे तुमचा डेटा सेव्ह करणारं. सध्या ते ‘USB Condom’ नावाने ओळखलं जातंय. कारण त्याचं कामच सुरक्षा राखणं हे आहे. USB Condom ची मागणी झपाट्याने वाढतेय.

अचानक USB Condom ची मागणी वाढण्याचं कारण हे नाहीये की याचं एखाद्याच्या खासगी जीवनाशी घेणं-देणं आहे. तर असं काहीही नाहीये. आजकाल पब्लिक युएसबी पोर्ट्स आणि चार्जर्सच्या आवश्यकतेमुळे हे उपकरण उपयोगी ठरत आहे. ‘USB Condom’ किंवा ‘USB डेटा ब्लॉकर’ हे एक उपकरण आहे. ते कोणत्याही स्मार्टफोन, टॅबलेट किंवा इलेक्ट्रिक डिव्हाइसमध्ये डेटा ट्रांसफर करण्यापासून रोखतं आणि केवळ चार्जिंगसाठी बॅटरीपर्यंत इलेक्ट्रिसिटी पोहोचवतं.

दिसायला अत्यंत साधं आणि आकारनं लहान असलेलं हे उपकरण जवळपास 500 रुपयांमध्ये ऑनलाइन खरेदी करता येतं. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय PortaPow USB डेटा ब्लॉकर (USB Condom) आहे. याला कोणत्याही युएसबी डेटा केबलशी कनेक्ट करता येतं. त्यानंतर पब्लिक युएसबी चार्जिंग स्टेशनच्या डिव्हाइसशी कनेक्ट केल्यास कोणत्याही प्रकारचा डेटा ट्रांसफर करता येत नाही. सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर हे डिव्हाइस युएसबी केबलला साध्या चार्जिंग केबलमध्ये रुपांतरीत करतं, ज्याद्वारे डेटा ट्रांसफर करता येत नाही. पण चार्जिंग मात्र सुरू राहतं.

कसे होतात चार्जिंग स्कॅम –
मध्यंतरी ‘Juice Jacking’ नावाचा प्रकार सुरू झाला होता. त्यात तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावला की तो हॅक केला जाऊ शकत होता. हॅकर्स पब्लिक चार्जिंग स्टेशनच्या मदतीने अनेक युजर्सना लक्ष्य करतात आणि त्यांच्या डिव्हाइसमध्ये व्हायरस (मॅलवेअर) सोडतात. याद्वारे डेटा सुरक्षित ठेवता येतो. सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगसाठी पोहोचलेल्या युजरने चार्जिंग स्टेशनमध्ये युएसबी केबलद्वारे डिव्हाइस चार्जिंगसाठी लावताच त्यामध्ये व्हायरसचा शिरकाव होतो. परिणामी युजर्सचा पर्सनल डेटा, पासवर्ड्स चोरी केले जातात. अशा प्रकारच्या USB चार्जिंग स्कॅमच्या वाढत्या प्रकारांमुळे ‘USB कंडोम’ आता आवश्यक बनलं आहे

का आहे आवश्यकता?
स्कॅमर्स किंवा हॅकर्स आपले युएसबी केबल मुद्दाम चार्जिंग स्टेशनवर ठेवून जातात आणि अन्य युजर त्या केबल थेट आपल्या डिव्हाइसमध्ये प्लग करतात. तर काही प्रकरणांमध्ये डिव्हाइस पूर्णतः लॉक होतो आणि स्कॅमर स्वतः डिव्हाइस अनलोक करण्यासाठी किंवा मदतीसाठी पुढे सरसावतात. त्याबदल्यात ते युजरकडे पैशांची मागणी करतात. यामुळेच युएसबी डेटा ब्लॉकर किंवा सोप्या शब्दात ‘USB condom’ जवळ असणं आवश्यक झालं आहे. परिणामी सतत फिरतीवर असणाऱ्यांमध्ये अर्थात ट्रॅव्हलर्समध्ये या छोट्या डिव्हाइबाबत प्रचंड क्रेझ पाहायला मिळतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 5:17 pm

Web Title: usb condom new device to keep you safe while travelling sas 89
Next Stories
1 HDFC चे कोट्यवधी खातेधारक वैतागले, सलग दुसऱ्या दिवशी महत्त्वाच्या सेवा ‘डाऊन’
2 धुम्रपान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘या’ कंपनीने दिली भन्नाट ऑफर
3 गायींना येतो ‘स्ट्रेस’; त्यावर शोधला टेक्नॉलॉजीने उपाय
Just Now!
X