20 February 2019

News Flash

खूशखबर! ‘व्हॅलेंटाईन डे’ ला आयफोन मिळेल अवघ्या १५ हजारात

आयपॅडवरही आकर्षक सूट

प्रातिनिधिक छायाचित्र

आयफोन वापरणे हे आजही आपल्याकडे म्हणजे स्टेटस सिम्बॉल समजले जाते. नवनवीन सुविधा देणारा आयफोन कायमच ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. पण या फोनच्या किंमतीमुळे इच्छा असूनही काहींना तो खरेदी करता येत नाही. पण अशांसाठी एक खूशखबर आहे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने कंपनीने एक खास ऑफर जाहीर केली आहे. तुम्ही एचडीएफसीचे ग्राहक असाल तर तुम्हाला तब्बल ७ हजार रुपयांपर्यंतची कॅशबॅक देण्यात येणार आहे. एचडीएफसी बॅंकेच्या क्रेडीट किंवा डेबिट कार्डने आयफोन खरेदी करणार असाल तर तुम्हाला EMI वर ७००० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर आयपॅड खरेदी केल्यास तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.

९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान ही ऑफर उपलब्ध आहे. यामध्ये iPhone SE, iPhone 6 आणि iPad वर कॅशबॅक देत आहे. ३२ जीबीच्या iPhone SE ची किंमत सध्या २२ हजार रुपये असून एचडीएफसीच्या कॅशबॅक ऑफरनंतर हा फोन तुम्हाला फक्त १५००० रुपयांत मिळेल. त्याचबरोबर iPhone 6 ची बाजारातील किंमत २७ हजार असून या ऑफरनंतर तो फोन २० हजारांना मिळू शकेल. अॅपलचे ९.७ इंचाचा ३२ जीबीचा आयपॅड बाजारात २८ हजाराला उपलब्ध आहे. तर १२८ जीबीचा ३५,७०० रुपयांना उपलब्ध आहे. पण एचडीएफसी बॅंकेच्या क्रेडीट किंवा डेबिट कार्डने आयफोन खरेदी केल्यास १० हजार रुपयांचे कॅशबॅक मिळाल्याने आयपॅडही १८ हजार तसेच २५,७०० रुपयांना मिळेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनला काही गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तरीही हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. मात्र एचडीएफसी बँकेच्या कॉर्पोरेट कार्डवर ही ऑफर उपलब्ध नसल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

First Published on February 11, 2018 1:13 pm

Web Title: valentine day exciting offer on iphone hdfc bank cashbak