23 January 2021

News Flash

Valentine’s Day : सिंगल आहात? तुम्हाला मिळेल ही भन्नाट ऑफर

तरुणाच्या भन्नाट डोक्यातून आली अनोखी कल्पना

व्हॅलेंटाईन डे जवळ आला की प्रेमीयुगुलांचे या खास दिवशी सेलिब्रेशन काय करायचे याचे नियोजन सुरु होते. एकीकडे ही जोडपी सेलिब्रेशन करत असताना सिंगल लोकांपुढे मात्र आपण काय करायचे हा प्रश्न असतो. त्यातही सिंगल असल्यामुळे त्यांना इतर मित्रमंडळींकडून मारले जाणारे टोमणेही त्यांना झेलावेच लागतात. मात्र अशाच लोकांचा विचार करुन अहमदाबाद येथे सिंगल असणाऱ्यांसाठी एक भन्नाट ऑफर देण्यात आली आहे. सिंगल असणाऱ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मोफत चहा देण्यात येणार आहे. एकीकडे इतर हॉटेल्स आणि कॅफे व्हॅलेंटाईनला होणाऱ्या गर्दीचे कसे नियोजन करायचे यात व्यस्त असताना दुसरीकडे मात्र या अनोख्या ऑफरचे कौतुक होताना दिसत आहे.

प्रफुल्ल बिल्लोरे या एमबी होऊन चहाचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात ही भन्नाट कल्पना आली आहे. हा इव्हेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रफुल्ल याने एक खास फेसबुक पेजही तयार केले आहे. १४ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ ते १० या वेळात ही ऑफर देण्यात येणार असल्याचे त्याने या पेजवर लिहीले आहे. हा कॅफे अतिशय आकर्षक असून अहमदाबाद येथील वस्त्रापूर येथे तो सुरु करण्यात आला आहे. २०१७ मध्ये रस्त्यावर सुरु केलेल्या या संकल्पनेचे आता कॅफेमध्ये रुपांतर झाले आहे. सुरुवातीला नातेवाईक आणि मित्रमंडळींनी आपल्याला वेड्यात काढले. मात्र जिद्द कायम असल्याने मी जे ठरवले होते ते करायचे ठरवले आणि पुढे जात राहीलो असे प्रफुल्ल सांगतो.

केवळ ८ हजारांच्या भांडवलासह प्रफुल्लने आपल्या या संकल्पनेची सुरुवात केली होती, ज्याचा आज वटवृक्ष झाला आहे. या कॅफेत तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे पाहायला मिळते. व्हॅलेंटाईनच्या या अनोख्या ऑफरबाबत सांगताना प्रफुल्ल म्हणतो, व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने प्रत्येक हॉटेल आणि कॅफेचालक विविध कल्पना लढवत असतात आणि ऑफर्स जाहीर करत असतात. त्याचप्रमाणे मी सिंगल असणाऱ्यांसाठी ही खास ऑफर ठेवली आहे. त्यामुळे तुम्ही सिंगल असाल आणि तुम्हालाही तुमचा व्हॅलेंटाईन डे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट करायचा असेल तर या ऑफरचा नक्की लाभ घ्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 1:31 pm

Web Title: valentines day valentines day 2019 valentines day gifts valentines day 2019 sms valentines day celebrations valentines day quotes exciting offer for singles ahmedabad prafulla billore
Next Stories
1 Oppo F11 Pro लवकरच होणार दाखल; जाणून घ्या फीचर्स
2 सॅमसंगची ‘एस’ सिरीज लवकरच होणार दाखल
3 जाणून घ्या कोणत्या मोबाइल फोन्समधून होतं सर्वाधिक रेडिएशन
Just Now!
X