आजपासून Valentine Week ‘व्हॅलेंटाइन वीक’ला सुरुवात झाली आहे. १४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन डे’पूर्वीचा हा आठवडा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो आणि Rose Day ‘रोझ डे’ने त्याची सुरुवात होते. प्रेमाचं प्रतिक असलेला गुलाबाचं फूल देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. या निमित्ताने राशीनुसार तुमच्या प्रेयसी किंवा प्रियकराला कोणत्या रंगाचा गुलाब दिल्यास फायदेशीर ठरेल, हे जाणून घेऊयात..
मेष- या राशीवर मंगळचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळे त्यांना लाल रंगाचा गुलाब देणं फायदेशीर ठरेल.
वृषभ- या राशीच्या व्यक्तींवर शुक्राचा प्रभाव असल्याने त्यांना गुलाबी रंगाचा गुलाब देणं योग्य ठरेल.
मिथुन- या राशीच्या व्यक्तींवर बुधचा प्रभाव अधिक असल्याने त्यांना आकर्षक गुलाबाची फुलं म्हणजेच लाल किंवा इतर गडद रंगाची फुलं भेट म्हणून द्यावीत.
कर्क- कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव असल्याने त्यांना पांढरा गुलाब देणं फायदेशीर ठरेल.
सिंह- या राशीच्या व्यक्तींवर सूर्याचा प्रभाव अधिक असल्याने लाल किंवा पांढरा गुलाब त्यांना दिल्यास ते प्रभावित होऊ शकतात.
कन्या- या राशीच्या व्यक्तींना पोपटी किंवा गुलाबी रंगाचे गुलाबाचे फूल देणं योग्य ठरेल.
तुळ- या राशीच्या व्यक्तींनाही गुलाबी रंगाचा गुलाब प्रभावित करू शकतो.
वृश्चिक- मंगळचा प्रभाव या राशीच्या व्यक्तींवर असल्याने त्यांना लाल किंवा पांढरा गुलाब द्यावा.
धनु- या राशीच्या व्यक्तींना पिवळा रंगाचा गुलाब आकर्षित करू शकतो.
मकर- निळ्या रंगाचा गुलाब मकर राशीच्या व्यक्तींना दिल्यास ते प्रभावित होऊ शकतात.
कुंभ- या राशीच्या व्यक्तींवर शनीचा प्रभाव जास्त असल्याने त्यांना निळा गुलाब देणं फायदेशीर ठरेल.
मीन- या राशीच्या व्यक्तींना पिवळा गुलाब देणं फायदेशीर ठरेल.
तर मग तुमच्या आवडत्या व्यक्तीला कोणत्या रंगाचा गुलाब देणार हा प्रश्न तरी सुटला असेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 10:10 am