01 June 2020

News Flash

5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी, Vivo U10 आता ‘ओपन सेल’मध्ये उपलब्ध

मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप, इलेक्ट्रिक ब्ल्यू आणि थंडर ब्लॅक अशा दोन कलर्सचे पर्याय

Vivo कंपनीच्या U सिरीजमधील पहिला स्मार्टफोन U10 आता भारतात ओपन सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. सप्टेंबर महिन्यात लाँच झाल्यापासून हा फोन केवळ फ्लॅश सेलमध्येच विक्रीसाठी उपलब्ध असायचा, पण आता ओपन सेलमध्ये उपलब्ध झाल्याने हा फोन केव्हाही अॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुन किंवा व्हिवो इ-स्टोअर्सद्वारे खरेदी करता येणार आहे. म्हणजेच हा फोन खरेदी करण्यासाठी आता फ्लॅश सेलची वाट पाहावी लागणार नाही. याशिवाय फोनच्या खरेदीवर नो कॉस्ट इएमआय, एचएसबीसी कॅशबॅक कार्डवर इंस्टंट 5 टक्के डिस्काउंट, 7 हजार 800 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर या ऑफरही आहेत.

या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या मागील बाजूला तीन कॅमेऱ्यांचा अर्थात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. हा फोन इलेक्ट्रिक ब्ल्यू आणि थंडर ब्लॅक अशा दोन कलर्सच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 एआयई एसओसी प्रोसेसरचा वापर यात करण्यात आला आहे. विविध तीन व्हेरिअंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून यातील 3GB रॅम + 32GB स्टोरेज क्षमतेच्या व्हेरिअंटची किंमत 8 हजार 990 रुपये आहे. तर, 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज क्षमतेचं दुसरं व्हेरिअंट असून 9 हजार 990 रुपये इतकी याची किंमत आहे. याशिवाय, 4GB रॅम + 64GB स्टोरेज क्षमतेच्या व्हेरिअंटची किंमत 10 हजार 990 रुपये इतकी आहे.

आणखी वाचा- केवळ ६९९ रुपयांत खरेदी करा JioPhone, दिवाळी ऑफरमध्ये महिनाभर वाढ

फीचर्स –
ड्युअल-सिमकार्डचा सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन अँड्रॉइड 9 पाय(9.1 फनटच) या ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असेल. यामध्ये वॉटरड्रॉप-स्टाइल नॉचसह 6.35-इंच HD+ डिस्प्ले आहे. यात विशेष अल्ट्रा गेमिंग मोड फीचर असून याद्वारे गेमिंगचा दर्जेदार अनुभव मिळेल. यामध्ये 4GB रॅमसह 64GB स्टोरेज असून इंटर्नल मेमरी कार्डद्वारे 256GB पर्यंत स्टोरेज वाढवता येणं शक्य आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या मागील बाजूला LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 13 मेगापिक्सल क्षमतेचा मुख्य कॅमेरा तर 8 आणि 2 मेगापिक्सल क्षमतेचे अन्य दोन कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेराही आहे. सेल्फी कॅमेऱ्यात AI फेस ब्यूटी आणि फेस अनलॉक यांसारखे फीचर्सही आहेत. फोनमध्ये तब्बल 5,000mAh क्षमतेच्या दर्जेदार बॅटरीचा वापर करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2019 10:45 am

Web Title: vivo u10 goes on open sale in india know price all features and offers sas 89
Next Stories
1 दर महिन्याला 35 रुपये द्यायची गरज नाही, व्होडाफोनने आणले ‘स्वस्त’ प्लान्स
2 वर्षभरापासून बेपत्ता मुलगी सापडली पॉर्न वेबसाईटवर
3 SBI Alert : लाखो पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 30 नोव्हेंबरपर्यंत करा ‘हे’ काम
Just Now!
X