Vivo कंपनीने आपल्या V सीरिजमधील लेटेस्ट स्मार्टफोन Vivo V21 5G भारतात लाँच केला आहे.  Vivo V21 5G मध्ये 44 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असून ऑप्टिकल इमेज स्टेबलायजेशनचा सपोर्टही आहे. Vivo V21 5G मध्ये मीडियाटेक Dimensity 800U प्रोसेसर आहे. हा फोन म्हणजे गेल्या वर्षी लाँच झालेल्या Vivo V20 ची नवीन आवृत्ती आहे. कंपनीने Vivo V21 5G मध्ये ड्युअल एलईडी फ्लॅश लाइटही दिली आहे.

Vivo V21 5G स्पेसिफिकेशन्स :-
Vivo V21 5G मध्ये अँड्रॉइड 11 आधारित Funtouch OS 11.1 आहे. याशिवाय 6.44 इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले असून मीडियाटेक Dimensity 800U प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेजशिवाय 3 जीबी व्हर्च्युअल रॅम देखील आहे. फोटोग्राफीसाठी यात मागील बाजूला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. 64 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल  + 2 मेगापिक्सेल असा हा सेटअप असून याशिवाय सेल्फीसाठी 44 मेगापिक्सेलचा कॅमेराही देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेऱ्यासोबत ड्युअल फ्लॅश लाइटचा पर्याय आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v5.1, GPS/A-GPS आणि USB Type-C पोर्ट आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर फिचर असून 33W फ्लॅश फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली  4000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.

Vivo V21 5G ची किंमत :-
Vivo V21 5G च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 29 हजार 990 रुपये आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 32 हजार 990 रुपये आहे. हा फोन आर्क्टिक व्हाइट, डस्क ब्लू आणि सनसेट डेझल असा तीन रंगांच्या पर्यायात खरेदी करता येईल. 29 एप्रिलपासून फोनसाठी प्री-बुकिंगला सुरूवात झाली आहे. तर, 6 मेपासून फ्लिपकार्ट आणि Vivo च्या ऑनलाइन स्टोअरमधून विक्रीला सुरूवात होईल. लॉचिंग ऑफरअंतर्गत  HDFC बँकेच्या  कार्डद्वारे Vivo V21 5G खरेदी केल्यास 2,000 रुपये कॅशबॅकची ऑफरही आहे.