विवो या चिनी कंपनीचा V7 हा फोन २० नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी या फोनची प्रत्यक्षात विक्री सुरु होईल, असेही कंपनीने सांगितले आहे. याआधी कंपनीने आपला विवो V7 + फोन बाजारात आणला होता. याआधी कंपनीने आपला विवो V7 + फोन बाजारात आणला होता. त्याचेच हे लोवर व्हर्जन आहे. विवो V7 + ची किंमत २१,९९० इतकी होती. तर विवो V7 ची किंमत मात्र अद्याप कळू शकलेली नाही. या नव्याने येणाऱ्या फोनचा डिस्प्ले हे त्या फोनचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. परंतु याबाबत नेमका अंदाज येण्यासाठी ग्राहकांना सोमवारपर्यंत वाट पाहवी लागणार आहे.

विवो V7 + या फोनमध्ये २४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, फोनची स्क्रीन ५.९९ इंचाची आहे. फोनला गोरिला ग्लास देण्यात आली असून त्यावर एकूण ३ लेअर आहेत. क्वाड-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर बरोबरच या फोनला ४ जीबी रॅम देण्यात आली आहे. याची मेमरी ६४ जीबी असून एक्स्पांडेबल मेमरी २५६ जीबी इतकी आहे. फोनला बॅटरी ३२२५ मिलीअॅम्पिअर्सची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची सगळी फिचर्स इतकी चांगली असल्याने विवो V7 ही तितकाच चांगला असेल असे म्हटले जात आहे. त्यामुळे ग्राहकांमध्येही त्याबाबत विशेष उत्सुकता आहे.