Vivo कंपनीने भारतात आपला Vivo Y20A हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. 6.51 इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसोबतच या फोनमध्ये कंपनीने 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर या फोनची बॅटरी तब्बल 17 तासांपर्यंत एचडी व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि 10 तासांपर्यंत गेमिंगचा बॅकअप देते, असा दावा कंपनीने केला आहे.

Vivo Y20A किंमत :-
2 जानेवारीपासून Vivo Y20A या फोनच्या विक्रीला सुरूवात होईल. 11 हजार 490 रुपये इतकी या फोनची किंमत आहे. 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटमध्ये हा फोन खरेदी करता येईल. कंपनीने Nebula Blue आणि Dawn White अशा दोन कलरमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे.

Vivo Y20A स्पेसिफिकेशन्स :-
फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड सपोर्ट आहे. अँड्रॉइड 11 वर आधारित FunTouch OS 11 चा सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 439 SoC प्रोसेसर मिळेल. 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनचं स्टोरेज मेमरी कार्डच्या मदतीने वाढवता येणं शक्य आहे.

Vivo Y20A कॅमेरा:-
Vivo Y20A फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. यातील 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि अन्य दोन्ही लेन्स 2-2 मेगापिक्सेलच्या आहेत. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे.

Vivo Y20A बॅटरी:-
कंपनीने या फोनमध्ये 10W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. ही बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 17 तासांपर्यंत एचडी व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि 10 तासांपर्यंत गेमिंग बॅकअप देईल असा कंपनीचा दावा आहे. फोनच्या पॉवर बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ब्लूटूथ 4.2, माइक्रो युएसबी पोर्ट, जीपीएस आणि एफएम रेडिओ आहे.