23 January 2021

News Flash

तब्बल 8GB रॅम + 5,000mAh बॅटरी; Vivo Y50 भारतात लाँच, विक्रीला सुरूवात

Vivo ने लाँच केला शानदार स्मार्टफोन

Vivo कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन Vivo Y50 दोन दिवसांपूर्वी भारतात लाँच झाला. आजापासून या स्मार्टफोनच्या विक्रीला ई-कॉमर्स वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये सुरूवात झाली आहे. Flipkart च्या लिस्टिंगद्वारे या फोनची विक्री भारतात 10 जूनपासून सुरू होईल ही माहिती मिळाली होती.

Vivo Y50 या स्मार्टफोनची खासियत म्हणजे या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. 5,000 एमएएच क्षमतेच्या पॉवरफुल बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. हा फोन सर्वप्रथम एप्रिल महिन्यात कंबोडियामध्ये लाँच करण्यात आला होता.

Vivo Y50 ची भारतात 17,990 रुपयांमध्ये विक्री होईल, ही किंमत 8 जीबी रॅम + 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. आयरिश ब्लू आणि पर्ल व्हाइट अशा दोन कलरच्या पर्यायात हा फोन उपलब्ध असेल. या फोनमध्ये होल-पंच डिझाइनसह 6.53 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड आधारित फनटच ओएसवर कार्यरत असून Vivo चा हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट शूटर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर, समोर स्क्रीनच्या वरील बाजूला होल-पंच आहे. यात 16 मेगापिक्सलच्या सेन्सरला जागा देण्यात आली आहे. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5,000 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, जीपीएस आणि युएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. तसेच, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि फिंगरप्रिंट सेंसर हे फीचरही फोनमध्ये आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 3:55 pm

Web Title: vivo y50 with 8gb ram 5000mah battery launched in india sale starts sas 89
Next Stories
1 गुगल मॅप्समध्ये नवीन फीचर, करोनाच्या संसर्गापासून वाचण्यास होणार मदत
2 ट्विटरचं नवीन फिचर ‘फ्लीट्स’; २४ तासांत गायब होणार पोस्ट
3 Xiaomi च्या शानदार स्मार्टफोनचा पुन्हा ‘सेल’, मिळेल Airtel ‘डबल डेटा’चा फायदा
Just Now!
X