News Flash

पाहा : चित्रपटप्रेमींसाठी ऋषिकेशमध्ये ‘हॉली बॉली’ हॉटेल

चित्रपटक्षेत्राच्या संकल्पनेवर आधारित ऋषिकेशमध्ये 'हॉली बॉली' हॉटेल उभारण्यात आले आहे.

ऋषिकेशमधील 'हॉली बॉली' हॉटेल

ऋषिकेश हे शहर आध्यात्मिक आणि धाडसी खेळांच्या पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, गंगा किनारी वसलेले ‘हॉली बॉली’ हॉटेल या शहराला वेगळेपण देते. चित्रपटक्षेत्राच्या संकल्पनेवर उभारण्यात आलेल्या या हॉटेलमधील मेनुलादेखील चित्रपटांचा तडका देण्यात आला आहे. मेनूकार्डवर हृतिक रसगुल्ला, गोविंदा गुलाब जामुन, ब्रॅड पिट सलाड आणि आमीर आलू दम अशी डेलिकसी अवतरलेली दिसते. हॉटेलची अंतर्गत सजावट निश्चितच तुम्हाला ‘टिंसल टाऊन’चा प्रवास घडविणारी अशी आहे. यात हिंदी चित्रपटांचा जवळजवळ सर्व प्रवास दर्शविण्यात आला आहे. ज्यात ‘काबुलीवाल’पासून ‘बॉबी’, ‘डीडीएलजे’, ‘लगान’ आणि ‘दम लगा के हैशा’पर्यंत जवळजवळ सर्व चित्रपटांची पोस्टर्स पाहायला मिळतात. संध्याकाळी गंगा किनारी होणारी आरती आणि गंगेचा नयनरम्य परिसर या हॉटेलच्या सुंदरतेत अधिकच भर घालतो. या शहराचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या विदेशी पर्यटकांवरदेखील ‘हॉली बॉली’ची भूरळ पडल्याचे पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 5:11 pm

Web Title: watch video movie buffs when in rishikesh visit hotel holly bolly for a filmy treat
Next Stories
1 हृदयाच्या झडपा स्वस्तात तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित
2 सकारात्मक विचारसरणीचा हृदयविकारात फायदा
3 आशियाई इबोलाचे विषाणू सर्व राज्यांमध्ये सक्रिय