News Flash

बॅगमध्ये असलेल्या या छोट्या फटीचा उपयोग माहितीय का तुम्हाला?

इअरफोनचे चिन्ह असलेली चौकोनी किंवा गोलाकार फट असते

जर कधी तुम्ही बॅग नीट पाहिली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की तिच्या हँडलच्या ठिकाणी किंवा कोप-यात एक गोलाकार किंवा चौकोनी फट असते या फटीवर इअरफोन किंवा हेडफोनचे चिन्ह दिलेले असते. तसं आपल्यासाठी या फटीचा उपयोग काहीच नसतो. फारफार तर शोभेसाठी ते असेल असं अनेकांना वाटतं पण याचा उपयोग काय ते अनेकांना माहिती नसते. तर या फटीला ‘इअर फोन होल’ असे म्हणतात. हल्लीच्या प्रत्येक बॅगवर स्टाईलिश इअर फोन होल असतो. याचा शोभेसाठी नाही तर इअर फोन ठेवण्यासाठी उपयोग केला जातो.

वाचा : जीन्सला हा छोटा कप्पा का असतो माहितीये?

वाचा : ..म्हणून शर्टच्या मागे असते ही छोटी पट्टी

अनेकांना कॉलेज, ऑफिसला जाताना गाणी ऐकण्याची सवय असते. गाणी ऐकताना इअरफोन्स किंवा हेडफोन्स आपण फोन, टॅबला कनेक्ट करतो आणि फोन खिशात ठेवतो. तेव्हा होतं असं की घाई गडबडीत फोन खाली पडतो किंवा दुर्दैवाने चोरीला तरी जातो. तेव्हा फोन बॅगमध्ये सुरक्षित ठेवून गाणी ऐकण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करु शकता. यामुळे कधी इअरफोनही पडण्याचा धोका नसतो. एकदा का इअरफोन या दोन खाचांमध्ये अडकले की ते सहज बाहेर निघणार नाही. तेव्हा आपल्यासारख्या धावपळ करणा-यांना हे इअरफोन होल उपयोगी ठरणार आहे आहेत. तेव्हा आजपासूनच याचा उपयोग करायला सुरूवात करा.

bag-earphone-hole-670

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2017 10:54 am

Web Title: what is the use of headphone symbol we find on bags
Next Stories
1 Healthy Living : डायबिटीज् घेतोय अनेकांचा जीव
2 टी बॅगचे हे पाच फायदे तुम्हाला माहितीयेत का?
3 कच्चा लसूण व कांदा झोपेसाठी उपयोगी
Just Now!
X