WhatsApp म्हणजे जगातील सर्वाधिक लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप. जगभरात जवळपास 1.5 अब्ज युजर्स WhatsApp चा वापर करतात. फॅमिली, फ्रेंड्ससोबत गप्पा मारण्याासाठी किंवा कार्यालयीन कामकाजासाठी आणि अगदी मीडिया फाइल्स सेंड करण्यासाठीही सर्वाधिक पसंती असलेले चॅट अ‍ॅप म्हणजे WhatsApp. युजर्सना चॅटिंगची अधिक मजा यावी यासाठी WhatsApp कडून वेळोवेळी नवीन फीचर्स आणले जातात.

WhatsApp ने खूप आधी युजर्सच्या चॅटिगचे टेक्स्ट (मेसेज) फॉर्मेट बदलणारे फीचर आणले होते. या फीचरमुळे चॅटिंग करताना अजून मजा यायला लागली, कारण युजर्स आपल्या आवडीचे फॉन्ट वापरत होते. तुम्हाला तुमच्या चॅटिंगचा फॉन्ट बोल्ड, इटॅलिक किंवा स्ट्राइक-थ्रू करण्याची पद्धत माहिती असेल. पण, तुम्ही टेक्स्ट फॉर्मेटला टाइपरायटर फॉन्टमध्येही बदलू शकतात हे माहितीये का?  पहिले तीन फॉन्ट काही कमांडसह सहजरित्या बदलता येतात. पण, टाइपरायटर फॉन्टसाठी तुम्हाला अधिक ट्रिकची आवश्यकता आहे.

जाणून घेऊया टाइपरायटर फॉन्ट कसा वापरायचा?
WhatsApp मेसेजचा फॉन्ट बदलण्यासाठी शब्दाच्या दोन्ही बाजूंना ` या सिंबॉलचा तीन वेळेस वापर करावा,  उदाहरणार्थ  ` ` `Hello` ` `  . यानंतर तुमचा मेसेज टाइपरायटर फॉन्टमध्ये बदलेल. हे फीचर अँड्रॉइड आणि iOS, दोन्ही कीबोर्डवर उपलब्ध आहे. हे करताना सिंबॉल ` च्या ऐवजी सिंबॉल ‘ चा वापर करणार नाहीत याची काळजी घ्या. अँड्रॉइड कीबोर्डवर सिंबॉल ` सहजरित्या मिळेल, पण आयफोन कीबोर्डवर हा सिंबॉल शोधण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल. आयफोनच्या कीबोर्डवर या सिंबॉलसाठी ‘ वर थोड्यावेळ टॅप करुन ठेवा, त्यानंतर तुम्हाला अनेक सिंबॉल दिसतील. यामध्येच ` हा सिंबॉल देखील असेल. याद्वारे तुम्ही WhatsApp चॅटिंग टाइपरायटर फॉन्टमध्ये बदलू शकतात.