20 November 2017

News Flash

व्हॉटसअॅपने आणले आणखी एक नवे फिचर

तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 7:00 PM

प्रतिकात्मक छायाचित्र

व्हॉटसअॅप अॅप्लिकेशनमध्ये सातत्याने सुधारणा होतात. नेटीझन्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारे हे अॅप्लिकेशन अपडेट असावे असा कंपनीचा प्रयत्न असतो. ग्राहकांना अॅप्लिकेशन वापरणे जास्तीत जास्त सोपे व्हावे यादृष्टीने कंपनीचा प्रयत्न सुरु असतो. सर्व वयोगटात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या व्हॉटसअॅपने आणखी एक नवीन फिचर लाँच केले आहे. या नव्या फिचरमुळे व्हॉटसअॅप वापरणे आणखी सोपे होणार आहे. त्यामुळे व्हॉटसअॅपच्या वापरकर्त्यांसाठी ही नक्कीच खूशखबर आहे.

सध्या या अॅप्लिकेशन्समध्ये विविध प्रकारच्या फाईल्स शेअर करता येतात. यामध्ये पीडीएफ, जीआयएफ, जेपीजी, व्हिडिओ यांसारखे फॉरमॅट फाईल्स आपण शेअर करु शकतो. मात्र नव्याने करण्यात आलेल्या बदलांमुळे याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारातील फाईल शेअर करता येणार आहेत. याशिवाय व्हॉटसअॅपवरुन १०० एमबीची फाईल देखील शेअर करता येणार आहे. ही सुविधा अँड्रॉईड फोनसाठी असून अॅपलचा फोन वापरणारे ग्राहक याहूनही मोठी फाईल शेअर करु शकतील अशी चर्चा आहे मात्र तसे नसून अँड्रॉईड आणि अॅपल दोन्ही युजर्ससाठी समान सुविधा देण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी कायमच तत्पर असते. याशिवाय यूजर्सना सर्व फोटो आणि व्हिडीओ आता कॅमेरा अॅपवर स्वाईप करुन बघता येणार आहेत. याशिवाय व्हॉटसअॅपवरुन कोणताही फोटो शेअर केला की त्याची क्वालिटी खराब होते अशी तक्रार करण्यात येते. मात्र यावरही कंपनीने तोडगा काढला असून विशिष्ट फोटोच्या गुणवत्तेत कोणताही बदल होणार नाही याची काळजी कंपनीकडून घेतली जाणार आहे.

First Published on July 17, 2017 6:09 pm

Web Title: whatsapp latest updated feature to share any type of document attachments