रिलायन्स जिओला बाजारात दाखल होऊन आजच दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. याचे निमित्त साधत जिओने एक विशेष घोषणा केली आहे. मोफत इंटरनेट दिल्यानंतर जिओने आपला स्वस्तातील मोबाईल लाँच केला. त्याला ग्राहकांनी उदड प्रतिसाद दिल्याने जिओने नुकताच आपला अपडेटेड मोबाईलही बाजारात आणला. जिओच्या पहिल्या फोनमध्ये व्हॉटस अॅपची सुविधा नसल्याने ग्राहक या फोनवर काहीसे नाराज होते. याचाच विचार करुन जिओने आपल्या नव्या फोनमध्ये व्हॉटस अॅपची सुविधा देऊ केली आहे. त्यामुळे आता जिओचा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना व्हॉटस अॅपचाही वापर करता येणार आहे.

विशेष म्हणजे जिओ फोनसाठी व्हॉट्सअॅपने नवीन व्हर्जन तयार केलं असून हे व्हर्जन काय ऑपरेटिंग सिस्टीम (KaiOS)ला सपोर्ट करते. व्हॉट्सअॅपचे हे नवीन व्हर्जन जिओ फोनमध्ये १० सप्टेंबरपासून उपलब्ध झाले आहे. मात्र अद्याप या फोनवर व्हॉटसअॅप सुरु झाले नसून येत्या २० डिसेंबरपासून ते ग्राहकांना प्रत्यक्ष वापरता येईल. त्यामुळे भारतातले जिओचे कोट्यवधी ग्राहक आता व्हॉट्सअॅपचा वापर करु शकतात असे व्हॉट्सअॅपचे उपाध्यक्ष क्रिस डॅनियल यांनी सांगितले.

जिओ फोनवर असं डाऊनलोड करा व्हॉट्सअॅप

– जिओ फोनमधल्या App Store वर क्लिक करा.

– याठिकाणी तुम्हाला फेसबुक, युट्यूबसोबत व्हॉट्सअॅपही दिसेल

– व्हॉट्सअॅपसमोर असलेल्या डाऊनलोड लिंकवर क्लिक करा

– व्हॉट्सअॅप डाऊनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून व्हॉट्सअॅप अॅक्टीव्ह करा

– व्हॉट्सअॅप अॅक्टीव्ह झाल्यानंतर तुम्ही चॅटिंग करू शकाल