व्हॉट्सअॅप स्टेटस हे WhatsApp च्या लोकप्रिय फीचर्सपैकी एक आहे. आता यामध्ये एक नवीन अपडेट जारी करण्यात आलं आहे. या नव्या फीचरद्वारे तुमचं व्हॉट्सअॅपचं स्टेटस थेट फेसबूक स्टोरीजवर शेअर करता येणार आहे. हे फिचर फेसबुकवर इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्यासारखेच आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या फीचरची चाचणी सुरू होती. आता चाचणी पूर्ण झाली असून एका रिपोर्टनुसार, कंपनीकडून सर्व युजर्ससाठी हे नवीन अपडेट जारी करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, या नव्या फीचरबाबत कंपनीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. व्हॉट्सअॅप अॅण्ड्रॉइड व्हर्जन 2.19.258 वर हे अपडेट उपलब्ध झालं आहे. यापूर्वी, जूनमध्ये अँड्रॉइड बीटा वापरणाऱ्या निवडक व्हॉट्सअॅप यूजर्सना फीचर वापरता येत होते, पण आता हे फिचर सर्वांना वापरता येणार आहे.
कसं वापरायचं हे फीचर –
सर्वप्रथम व्हॉट्सअॅप ओपन करा आणि ‘MY STATUS’ वर टच करा. त्यानंतर त्यासमोर असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा . तेथे तुम्हाला ‘Share to Facebook Story’ हा पर्याय दिसेल. त्यावर टच करुन तुम्ही तुमचं स्टेटस शेअर करु शकतात.