News Flash

WhatsApp Web साठी नवीन फिचर, आता डेस्कटॉपवरुनही करता येणार ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग

व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये व्हिडिओ/ऑडिओ कॉलिंग फिचर...

( संग्रहित छायाचित्र)

लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp कडून आपल्या युजर्ससाठी सतत नवनवे फिचर्स आणले जात असतात. आता कंपनीने अजून एक नवीन फिचर आणलं असून याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप वेबवरुनही (डेस्कटॉप व्हर्जन) ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलिंगची सेवा मिळेल.

अनेक दिवसांपासून या फिचरची चर्चा होती, अखेर आता कंपनीने हे फिचर रोलआउट करण्यास सुरुवात केल्याचं समजतंय. व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये बीटा युजर्ससाठी व्हिडिओ/ऑडिओ कॉलिंगच्या फिचरवर अनेक दिवसांपासून चाचणी सुरू होती. WABetainfo च्या रिपोर्टनुसार, आता हे फिचर कंपनीने सामान्य युजर्ससाठीही रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप वेब/डेस्कटॉप व्हर्जन 2.2104.10 मध्ये हे फिचर रोलआउट केलं जात आहे.

या फिचरनुसार, कॉल आल्यानंतर WhatsApp Web मध्ये एक नवीन विंडो पॉप अप होईल, तिथून युजर्स कॉल स्वीकारू किंवा नाकारु शकतात. अशाचप्रकारे WhatsApp Web वरुन कॉलिंग करण्यासाठीही एक पॉप अप मिळेल, तिथे कॉलिंगसाठी पर्याय दिलेला असेल. अन्य व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्मप्रमाणे यामध्येही युजर्सना व्हिडिओ ऑफ, व्हॉइस म्यूट आणि रिजेक्ट करण्याचा पर्याय मिळेल. WhatsApp Web मध्ये कॉलिंगदरम्यान युजर्स मुख्य व्हॉट्सअ‍ॅप इंटरफेसवरही चॅटिंग करु शकतात, कारण इथे कॉलिंगसाठी वेगळी पॉप-अप विंडो ओपन होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 10:51 am

Web Title: whatsapp slowly rolling out voice and video calling feature for web sas 89
Next Stories
1 भारतात 1000 पेक्षा जास्त इंजिनिअर्सची भरती करणार PayPal, टॉप कॉलेजेसमधून होणार निवड
2 ३० मिनिटात बनवा प्रोटीन युक्त लाडू
3 7000mAh बॅटरीच्या Samsung Galaxy F62 वर वाचवा 2,500 रुपये; जाणून घ्या पूर्ण ऑफर
Just Now!
X