लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp कडून आपल्या युजर्ससाठी सतत नवनवे फिचर्स आणले जात असतात. आता कंपनीने अजून एक नवीन फिचर आणलं असून याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप वेबवरुनही (डेस्कटॉप व्हर्जन) ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलिंगची सेवा मिळेल. व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये व्हिडिओ/ऑडिओ कॉलिंगच्या फिचरवर अनेक दिवसांपासून चाचणी सुरू होती. WABetainfo च्या रिपोर्टनुसार, कंपनीने बीटा युजर्ससाठी हे नवीन फिचर रोलआउट केलं आहे. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर लवकरच कंपनीकडून हे फिचर सर्वांसाठी जारी केलं जाणार आहे.

या फिचरनुसार, कॉल आल्यानंतर WhatsApp Web मध्ये एक नवीन विंडो पॉप अप होईल, तिथून युजर्स कॉल स्वीकारू किंवा नाकारु शकतात. अशाचप्रकारे WhatsApp Web वरुन कॉलिंग करण्यासाठीही एक पॉप अप मिळेल, तिथे कॉलिंगसाठी पर्याय दिलेला असेल. अन्य व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्मप्रमाणे यामध्येही युजर्सना व्हिडिओ ऑफ, व्हॉइस म्यूट आणि रिजेक्ट करण्याचा पर्याय मिळेल. WhatsApp Web मध्ये कॉलिंगदरम्यान युजर्स मुख्य व्हॉट्सअ‍ॅप इंटरफेसवरही चॅटिंग करु शकतात, कारण कॉलिंगसाठी वेगळी पॉप-अप विंडो ओपन होते. मात्र, हे फिचर सामान्य युजर्ससाठी कधीपर्यंत रोलआउट केलं जाईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.