News Flash

नंबर बदलला, चिंता नको! व्हॉट्स अॅपचे हे नवे फिचर ठरणार फायदेशीर

व्हॉटसअॅप हे अॅप्लिकेशन सध्या लोकांसाठी अनिवार्य गरज बनली आहे. फोटो किंवा फाईल पाठवणं, लोकेशन शेअर करणं, फोन किंवा व्हिडिओ कॉलिंग करणं अशा अनेक गोष्टी व्हॉट्सअॅपमुळे

whatsapp

व्हॉटसअॅप हे अॅप्लिकेशन सध्या लोकांसाठी अनिवार्य गरज बनली आहे. फोटो किंवा फाईल पाठवणं, लोकेशन शेअर करणं, फोन किंवा व्हिडिओ कॉलिंग करणं अशा अनेक गोष्टी व्हॉट्सअॅपमुळे सहज शक्य झाल्यात. व्हॉट्सअॅप लोकांच्या गरजा लक्षात घेऊन दिवसेंदिवस वेगवेगळ्या फीचरचा समावेश करत आहे. आता युजर्सची सर्वात मोठी गरज लक्षात घेऊन व्हॉट्स अपनं आणखी एक फीचर आणलं आहे. या फीचरमुळे जर एखाद्या युजरने आपला नंबर बदलला तर त्याची माहिती त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या इतर युजर्सनादेखील मिळणार आहे.

फोन नंबर बदलला की युजर्स नवीन नंबरवरून व्हॉट्स अॅप सुरू करतात. आता आपला नवीन नंबर प्रत्येकाकडेच असतो असं नाही, तेव्हा प्रत्येकला वैयक्तिक मेसेज करून सांगावं लागतं. युजर्सची ही अडचण लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने नवीन फीचर आणलं आहे त्यानुसार जर युजरने नंबर बदलला तर त्याचे नोटीफिकेश त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या प्रत्येक व्यक्तीला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला वैयक्तिक मेसेज करून माहिती देण्याचे युजरचे श्रम वाचणार आहेत.

आपल्या बदललेल्या नंबरची माहिती कोणाला द्यायची की किंवा कोणाला नाही, हेदेखील युजर ठरवू शकतो. नुकतंच व्हॉट्स अॅपने भारतीयांसाठी लाईव्ह लोकेशन शेअरचं फीचर आणलं होतं. त्यामुळे युजर्सना आपलं लाईव्ह लोकेशन शेअर करता येणार आहे. युजर्सच्या सुरक्षेसाठी याचा अधिक फायदा होईल असंही म्हटलं जातं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2017 10:00 am

Web Title: when you change phone number whatsapp will notify
Next Stories
1 …म्हणून जेवल्यानंतर लगेच झोपू नका
2 विशिष्ट प्रशिक्षण पद्धतीने मेंदूच्या क्षमतेत वाढ शक्य
3 महिलाच नाही तर पुरुषही करतात गॉसिप
Just Now!
X