News Flash

काही लोकांना डास जास्त का चावतात? जाणून घ्या!

काही लोक असे असतात ज्यांच्याकडे डास जास्त आकर्षित होतात म्हणजेच त्या लोकांना डास जास्त चावतात.

काही लोकांना डास जास्त आकर्षित करतात. त्यात 'O' रक्तगट असणार्‍यांना डास अधिक चावतात.

डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा त्यांच्यापासून अनेक आजारांच्या समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यात तर आपल्याला डासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. कारण पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याने साचलेल्या पाण्यात डासांची पैदास अतिवेगाने होत असते. एका रिसर्चद्वारे असे समजले आहे की, काही लोकांकडे डास जास्त आकर्षित होऊन त्या लोकांना जास्त चावतात. चला तर मग जाणून घेऊयात काही लोकांना डास जास्त का चावतात?

भडक रंगाचे कपडे पाहून चावतात डास

सर्वसाधारपणे डास हे कोणत्याही व्यक्तीला पाहिल्यावर व त्या व्यक्तीच्या वासामुळे त्यांना चावतात. डासांची नजर फार चांगली असते. जेव्हा तुम्ही खासकरून एखादे भडक रंगाचे कपडे, जसे की निळा, लाल, काळा या रंगाचे कपडे परिधान करता तेव्हा डास या रंगांकडे जास्त आकर्षित होतात.

कार्बन डाय ऑक्साईड डासांना करतात आकर्षित

आपण प्रत्येकजण ऑक्सिजन घेतो व कार्बनडाय ऑक्साईड सोडतो. कार्बन डाय ऑक्साईड या गॅसकडे डास जास्त आकर्षित होतात. हे डास आपल्या चेहर्‍याजवळ जास्त फिरताना दिसतात. डास हे १६६ फुटांवरून देखील कार्बन डाय ऑक्साईड गॅसचा वास ओळखू शकतात. तर डास हे कार्बन डाय ऑक्साईडसोबतच अजून काही असे घटक आहेत ज्यामुळे डास आपल्याकडे आकर्षित होतात. उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या शरीरातून निघणार्‍या घामातून लॅक्टिक अ‍ॅसिड, यूरिक अ‍ॅसिड आणि अमोनिया हे घटक डासांना जास्त आकर्षित करतात. ज्या लोकांना जास्त घाम येतो त्यांना डास जास्त चावतात.

ठराविक रक्तगटाच्या लोकांना व गर्भवती महिलांना डास करतात केंद्रीत टार्गेट

गर्भवती महिलांना देखील डास जास्त चावतात. कारण गर्भवती महिला एका सामान्य महिलेच्या तुलनेत जास्त कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडत असते. त्यामुळे गर्भवती महिलांकडे डास जास्त आकर्षित होतात. मादी डास अंडे देण्यासाठी रक्तातील प्रोटीन मिळवतात. त्यात O आणि A रक्तगट असलेल्या व्यक्तींना डास खूप चावतात. तर B रक्तगट असलेल्यांना डास तुलनेने कमी चावतात.

या बाबींमुळे डास अधिक चावतात

१. O रक्तगट असणार्‍यांना डास अधिक चावतात.

२. काही लोकांना खूप घाम येतो व घामातून निघणार्‍या लॅक्टिक अ‍ॅसिड, यूरिक अ‍ॅसिड आणि अमोनिया हे घटक डासांना जास्त आकर्षित करतात. त्या लोकांना डास जास्त चावतात.

३. जास्त कार्बन डाय ऑक्साईड बाहेर सोडणार्‍या लोकांना डास चावतात.

४. ज्या लोकांच्या शरीराचे तापमान जास्त असते. त्यांना देखील डास जास्त प्रमाणात चावतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 10:50 am

Web Title: why do mosquitoes bite some people more others scsm 98
Next Stories
1 बाजारात नवीन काय? : तीन नव्या विद्युत दुचाकी
2 घरबसल्या वाहन परवाना
3 तुम्ही मस्कारा लावता? मग अशी घ्या तुमच्या डोळ्यांची काळजी!
Just Now!
X