पुरुष अधिक कार्यत्तपर की महिला यामुळे नेहमीच कित्येकजणांमध्ये वाद होत असतो. पण एका संशोधनातून दोघांमधील अधिक कोण कार्यतत्पर आहे हे सिद्ध झाले आहे. महिलांचा मेंदू हा पुरूषांच्या तुलनेत ८ टक्के लहान असतो असे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र, मेंदूचा आकार लहान असूनही कोणतेही काम पूर्ण करण्यात महिलाच पुरूषांच्या तुलनेत अधिक तप्तर आणि कार्यक्षम असतात असे संशोधकांना आढळले आहे. मेंदू लहान असूनही महिला आणि पुरूषांच्या बुद्धिमत्तेत फरक नसतो असे संशोधन करण्यात आले आहे. या संदर्भात कॅलिफोनिर्या विद्यापीठ, लॉस एन्जेलिस, तसेच स्पेनमधील माद्रिद विद्यापीठातील संशोधकांनी विशेष संशोधन केले आहे.
महिलांचा मेंदू लहान असला तरी त्या कमी पेशी आणि कमी ऊर्जा वापरूनच कामे पूर्ण करतात. या परिक्षणासाठी १८ ते २५ वयोगटातील ५९ महिला आणि ४५ पुरुषांची निवड करण्यात आली होती. स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, भावना याबाबत मेंदूतील हिप्पोकॅम्पस नामक भाग महत्वाची भूमिका बजावत असतो. महिलांच्या मेंदूतील हा भाग काम करतेवेळी कमी ऊर्जेचा वापर आणि मेंदूंच्या पेशींचाही कमी प्रमाणात वापर करत असल्याचे संशोधनात आढळले. महिलांच्या मेंदूच्या नसा अधिक जवळ असतात. त्यामुळे, कदाचित त्या काम गतीने करत असाव्यात असे संशोधकांचे म्हणणे आहे.