आपल्याला अनेक आजारांबद्दल माहिती असते. पण मेंदूच्या, डोक्याच्या आजारांबद्दल आपण कमी जागरूक असतो. यातील सर्वात गंभीर आजार म्हणजे ब्रेन ट्यूमर. कारण याचा अंदाजच लागत नाही आणि जेव्हा कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आज, सोमवार ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्युमर दिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्याची सुरूवातीची लक्षणे कोणती असतात. बंद कवटीत जेव्हा ब्रेन टय़ूमरची गाठ जागा व्यापू लागते तेव्हा तिचा दाब मेंदूवर पडायला लागतो. त्यामुळे ब्रेन टय़ूमरच्या ७५ ते ८० टक्के रुग्णांमध्ये टय़ूमर झाल्याची लक्षणे दिसून येतात. पाहूयात ब्रेन ट्युमरची सुरूवातीची लक्षणे कोणती आहेत…

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
ग्रामविकासाची कहाणी

डोकं दुखणे
ब्रेन ट्युमरचे सर्वात पहिलं आणि सामान्य लक्षण म्हणजे सतत डोकं दुखणे. साधारणपणे सकाळच्या वेळी डोकेदुखी अधिक होते आणि पुढे ती वाढतच जाते. डोकेदुखीच्या वेदना कधीकधी इतक्या वाढतात की त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडते.. अशाप्रकारची डोकेदुखी तुम्हाला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका…

उलटी आणि मळमळ

डोकं दुखण्यासोबतच उलटी सुरु होणं, हे ब्रेन ट्युमरचे दुसरं लक्षण आहे. कधी कधी सकाळपासून डोकं दुखतं आणि दिवसभर मळमळ व्हायला लागते.

झटका लागणे –
कोणत्याही प्रकारच्या ट्युमरमध्ये झटका येणं हे सुरुवातीचे लक्षण असते. मेंदूतील ट्युमरमुळे न्युरॉन्स अनियंत्रित होतात. त्यामुळे व्यक्तीची हालचाल सामान्य राहत नाही. या स्थितीत पूर्ण शरीराबरोबरच कोणत्याही एका अंगाला झटका लागल्यासारखे वाटू शकते.

चक्कर येणे –
चक्कर आल्यानंतर आपण अशकतपणामुळे चक्कर आली असेल असं म्हणतो. पण जर सतत चक्कर येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. चक्कर येऊ खाली पडत असाल तर हे ब्रेन ट्युमरचे लक्षण आहे. जर ट्युमर सेरिबॅलम असेल तर त्याने शारीरिक संतुलन प्रभावित होतं. त्याचाच हा भाग आहे.

बोलण्यात अडचण –
ब्रेन ट्युमर जसा जसा वाढत जातो तसं बोलताना अडचण होते. तोंडातून स्पष्ट उच्चार येत नाहीत. हा ट्युमर पुढे सरकत सरकत टॅपोरल लोबमध्ये येतो आणि त्या व्यक्तीला बोलण्यात अडचण निर्माण होते. अशात त्या व्यक्तीचा आवाज जाण्यासोबतच तोंड एकीकडे वाकडं होतं.

स्मरणशक्ती कमी होणे –
ब्रेन ट्युमरमुळे व्यक्तीचा स्वभावात बदल होतो. विसराळूपणा वाढल्यास त्या व्यक्तीला ब्रेन ट्युमर झालेला असू शकतो. तसेच त्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो.

उलटीसारखे होणे –
सतत पोट खराब होत असल्यास किंवा सारखं उलटीसारखे वाटत असल्यास हे देखील काळजीचे कारण असेल. सातत्याने ही समस्या असल्यास आणि याचं कारण अस्पष्ट असल्यास काळजीचं कारण आहे. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

अंधुक दिसणे –
अंधुक दिसणे, डबल दिसणे किंवा दृष्टी जाणे, हे ट्युमरचे लक्षण आहे.