21 September 2020

News Flash

World Water Day: प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल तर वेळीच सावध व्हा कारण…

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने नेमके कोणते त्रास होतात त्याविषयी

वेळीच सावध व्हा

प्लास्टिक आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक असते असे आपण अनेकदा ऐकतो. मात्र हे प्लास्टिकला तातडीने पर्याय शोधणे सध्या तरी शक्य दिसत नाही. प्लास्टिकच्या पिशव्या, विविध भांडी आणि इतरही अनेक प्लास्टिकच्या वस्तू दैनंदिन वापरात दिसता. त्यातही मुख्यतः पाणी पिण्याच्या बाटल्या या प्लास्टिकच्याच असतात. मात्र त्यामुळे या प्लास्टिकच्या बाटल्यांचा आरोग्याला त्रास होऊ शकतो. प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने नेमके कोणते त्रास होतात त्याविषयी…

१. आपण बाहेर पडताना बऱ्याचदा पाण्याची बाटली सोबत घेतो पण ही बाटली प्लास्टिकची असते. या प्लास्टिकची गुणवत्ता चांगली नसल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

२. विकत मिळणाऱ्या प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी आणखीनच हानिकारक असते. विकतच्या बाटल्या कमी दर्जाच्या असल्याने त्यातून पाणी पिऊ नये.

३. प्लास्टिकची बाटली सूर्यप्रकाश, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यास त्यातून विषारी द्रव्ये बाहेर पडतात. ही द्रव्ये पाण्यात मिसळली गेल्याने ते पाणी पिणे चांगले नसते.

४. अनेकदा प्लास्टिक बाटल्या या पॉलीथिलीन आणि पॉलीप्रॉपिलीनने तयार केलेल्या असतात. मात्र यामध्ये थंड पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं तरच त्या वापरणे सुरक्षित आहे.

५. मिनरल वॉटरची बाटली तुम्ही विकत घेतल्यावर ती बाटली पुन्हा वापरु नये. तसेच आपली नियमीत पाण्याची बाटली कोमट पाणी, विनेगर किंवा अँटीबॅक्टेरिअल माऊथवॉशरने स्वच्छ करत रहावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 12:54 pm

Web Title: world water day harmful effects of drinking water in plastic bottles
Next Stories
1 World Water Day: जाणून घ्या पाणी का प्यावे, कसे प्यावे आणि किती प्यावे
2 ‘गुगल प्लस’ची सेवा या तारखेपासून होणार बंद
3 सावधान…! तर तुमचे ‘हे’ व्हॉटसअप अकाऊंट होईल बंद
Just Now!
X