ख्यातनाम तंत्रज्ञ आणि ‘टेस्ला’ या आघाडीच्या ऑटोमोबाइल कंपनीचे मालक इलॉन मस्क आणि त्यांची प्रेयसी ग्रिम्स यांना पुत्ररत्न प्राप्ती झालीये. मस्क यांनी याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. यासोबत त्यांनी बाळाचा फोटो शेअर केला आणि बाळाचं नावही सांगितलं. पण, त्यांच्या बाळाचं अनोखं नाव वाचून नेटकरी मात्र पार चक्रावून गेलेत.

“X Æ A-12” असे मस्क यांच्या मुलाचं नाव आहे. हो तुम्ही वाचलं ते बरोबर आहे. X Æ A-12 असं इलॉन मस्कच्या बाळाचं नाव असणार आहे. याचा उच्चार नेमका कसा करायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, तोच प्रश्न सोशल मीडियावरील लाखो युजर्सनाही पडलाय. अनेकांनी या नावाचा नेमका अर्थ शोधायला सुरूवात केली आणि त्यानंतर यावरुन अनेक जोक्स आणि मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नेटकऱ्यांकडून वारंवार नावाचा अर्थ काय अशी विचारणा केली जात असल्याने अखेर मस्कची प्रेयसी गायिका ग्रिम्स हिने स्वतः एका ट्विटद्वारे नेटकऱ्यांना नावाचा अर्थ सांगितला.

पण, ग्रिम्सने सांगितलेला अर्थही अनेकांना डोक्यावरुन गेला आणि त्यावरुनही आता अनेक जोक्स व्हायरल होत आहेत.