Xiaomi ने नुकतेच भारतात Mi Polarised Square सनग्लासेस लाँच केले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार केवळ 899 रूपयांमध्ये हे सनग्लासेस विकत घेता येतील. ब्लू आणि ग्रे या दोन कलर व्हेरिअंटमध्ये ग्राहकांना हे सनग्लासेस विकत घेता येणार आहेत. यामध्ये पोलाराईज्ड लेंसचा वापर करण्यात आला आहे. तसेच युजर्सना उत्तम प्रकारची व्हिज्युअल क्लॅरिटी मिळू शकेल असा दावा Xiaomi कडून करण्यात आला आहे.

Mi Polarised Square सनग्लासेसमध्ये याव्यतिरिक्त अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

Mi Polarised Square सनग्लासेस TAC पोलराईज्ड लेंससोबत लाँच करण्यात आले आहे. ही O6 लेयर्ड लेंस टेक्नोलॉजी म्हणून परियचयाची आहे.

ही टेक्नॉलॉजी ग्लेअर, पोलाराईज्ड ग्लेअर, पोलाराईज्ड लाईट आणि हार्मफुल UV रेंजला आपल्या डोळ्यांना इजा पोहोचवण्यापासून थांबवते.

याव्यतिरिक्त पोलाराईज्ड लेंस कॉन्ट्रास्टला एन्हांस करते, तसेच व्हिज्युअल क्लॅरिटीलाही वाढवते आणि आय स्ट्रेनलाही कमी करते.

पोलाराईज्ड सनग्लासेस स्क्रॅच रेझिस्टंट असल्याचा दावा Xiaomi कडून करण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त यामध्ये फ्लेक्सिबल TR90 फ्रेम्स देण्यात आल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच यातील ग्लासेस ड्युरेबल, लाईटवेट आणि फ्लेक्सिबल असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

Xiaomi Mi Sunglasses हे युनिसेक्स आहेत. तसेच यासोबत सहा महिन्यांची वॉरंटीही देण्यात येते.

Xiaomi च्या वेबसाईटवरून Mi Sunglasses खरेदी करता येऊ शकतात.