शाओमी इंडियाने नवीन वर्षातील (2021) आपला पहिला 5जी स्मार्टफोन Mi 10i (अनबॉक्सिंग) भारतात लाँच केलाय. या वर्षी लाँच झालेला हा पहिला 5जी स्मार्टफोन आहे. Mi 10i या नावातील ‘I’ चा अर्थ इंडिया असून हा फोन भारतीयांच्या गरजेनुसार डिझाइन करण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे. Mi 10i मध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर आणि तब्बल 108 मेगापिक्सेलचा Samsung HM2 sensor दिलाय.

Mi 10i ची किंमत :
Mi 10i च्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 20 हजार 999 रुपये, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 21 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 23 हजार 999 रुपये आहे. कंपनीची वेबसाईट, एमआय स्टोअर्स आणि अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरुन फोनच्या विक्रीला सात जानेवारीपासून सुरूवात होईल. पॅसिफिक सनराइज, मिडनाइट ब्लॅक आणि अटलांटिक ब्लू अशा तीन कलर्समध्ये हा फोन खरेदी करता येईल. तर, ८ जानेवारीपासून हा फोन ओपन सेलमध्ये खरेदी करता येईल. लाँचिंग ऑफरअंतर्गत जिओकडून या फोनच्या खरेदीवर 10 हजार रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळतील.

आणखी वाचा- स्वस्त झाला Nokia चा पाच कॅमेऱ्यांचा जबरदस्त स्मार्टफोन, किंमत 15 हजारांपेक्षा कमी

Mi 10i स्पेसिफिकेशन्स :
Mi 10i मध्ये अँड्रॉइड 10 आधारित MIUI 12 आहे. याशिवाय फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असून डिस्प्लेसोबतच वॉटर ड्रॉप नॉच आहे. डिस्प्लेसोबत HDR आणि HDR10+ चा सपोर्ट आहे. फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनलवर गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर आहे, हे एक 5जी प्रोसेसर आहे. ग्राफिक्ससाठी यामध्ये एड्रेनो 619 GPU आहे, तर 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज फोनमध्ये मिळेल.

Mi 10i कॅमेरा :
फोनमध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. यातील मुख्य लेन्स 108 मेगापिक्सेल Samsung HM2 सेन्सर आहे. तर, दुसरा 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड, तिसरा 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो आणि चौथा 2 मेगापिक्सेलचा डेफ्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल. कॅमेऱ्यासोबत 4के व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधाही आहे.

आणखी वाचा- फ्लिपकार्टवर सुरू झाला Realme Days Sale, या स्मार्टफोनच्या खरेदीवर होईल 10 हजारांची बचत

Mi 10i बॅटरी :
Mi 10i मध्ये 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4820mAh ची बॅटरी आहे. अवघ्या ३० मिनिटांत फोनची बॅटरी 68 टक्के चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 5G, USB Type-C पोर्ट, 3.5mm ऑडिओ जॅक, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ यांसारखे फिचर्स आहेत. याशिवाय फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.