शिओमीने स्पेनमध्ये झालेल्या आपल्या ग्रॅंड इव्हेंटमध्ये कालच दोन नवीन मॉडेल्स दाखल केली. यामध्ये Mi A2 आणि Mi A2 Lite या दोन मोबाईलचा समावेश होता. या दोन्ही फोनबाबत मागच्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होती, त्यांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. हे दोन्ही फोन गुगलच्या अँड्रॉईड प्रोग्रामचे महत्त्वाचा भाग आहेत. हे फोन लाँच होण्याआधीच त्याचे फिचर्स आणि किंमत लीक झाली होती. शिओमी Mi A2 या फोनची स्क्रीन ५.९९ इंचाची फुल एचडी असेल. तसेच तर Mi A2 Lite या फोनला ५.८४ इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे.

कंपनीने फोनची अधिकृत किंमत सांगितलेली नसून त्या लीक झाल्या आहेत. Mi A2 च्या ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत साधारणत: २२,००० रुपये आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत २४,६०० च्या जवळपास आहे. तर Mi A2 Lite या फोनच्या ३ जीबी रॅमची किंमत १६,३०० रुपये असून ४ जीबी रॅमची किंमत १९,७६० रुपये आहे. Mi A2 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर वापरण्यात आला असून यात १२८ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. यामध्ये ३०१० मिलिअॅम्पिअर्सची बॅटरी देण्यात आली आहे. हे दोन्ही फोन अँड्रॉईड ८.१ ओरियोवर चालतील. Mi A2 Lite या फोनला ४००० मिलिअॅम्पियर्सची बॅटरी देण्यात आली आहे. या दोन्ही फोनचे रिअर कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरेही अतिशय चांगले आहेत.