News Flash

‘शाओमी’च्या स्वस्त Redmi 8A Dual चा पहिलाच सेल , मिळेल 5000mAh ची दमदार बॅटरी आणि…

परवडणाऱ्या किंमतीत दमदार फीचर्स

‘शाओमी’ची सब ब्रँड कंपनी रेडमीने काही दिवसांपूर्वीच आपला नवीन बजेट स्मार्टफोन Redmi 8A dual भारतीय बाजारात आणला. अद्याप या फोनची विक्री सुरू झाली नव्हती. आज(दि.18) पहिल्यांदाच या फोनच्या विक्रीसाठी विशेष सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. हा फोन म्हणजे कंपनीच्या रेडमी 8A ची पुढील आवृत्ती आहे. या स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लास 5, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि फास्ट चार्जिंग यांसारखे फीचर्स मिळतात. हा फोन सी ब्लू, स्काय व्हाइट आणि मिडनाइट ग्रे या तीन नवीन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

आणखी वाचा – (स्वस्तात घर-खरेदी! SBI कडून कर्जबुडव्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव, तुम्हीही करु शकता खरेदी)

Redmi 8A dual फीचर्स –
दुपारी 12 वाजेपासून या फोनच्या विक्रीसाठी कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ Mi.com आणि अ‍ॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळार सेलला सुरूवात होईल. या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसह 6.22-इंच HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 2Ghz क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर असून 2 जीबी आणि 3 जीबी रॅमसोबत येणाऱ्या या फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये VoWiFi फीचर देखील आहे. फोटोग्राफीसाठी Redmi 8A dual मध्ये दोन रिअर कॅमेरे आहेत. यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर असेल. Ai सीन डिटेक्शन आणि Ai पोर्टेट मोड असे फीचर्स कॅमेऱ्यासोबत आहेत. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 5000 mAh ची दमदार बॅटरी असलेला हा फोन 18W फास्ट चार्जरसोबत येतो. याशिवाय फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंगचं फीचरही देण्यात आलं आहे.

किंमत –
हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असेल. 2 जीबी रॅम व्हर्जनची किंमत 6 हजार 499 रुपये आणि 3 जीबी रॅम व्हर्जनची किंमत 6 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ Mi.com आणि अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावरुन या फोनची विक्री होईल. 18 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता या फोनच्या विक्रीसाठी खास सेलचं आयोजन करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 8:04 am

Web Title: xiaomi redmi 8a dual to go on sale for the first time in india know price specifications and other details sas 89
टॅग : Mobile,Mobiles,Smartphone
Next Stories
1 स्मार्टफोनला COOL ठेवणारा खास पंखा, Xiaomi चं नवीन प्रोडक्ट
2 Airtel चा स्वस्त प्लॅन, 19 रुपयांत फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटाही
3 अजून ‘स्वस्त’ झाला Nokia चा ‘बजेट’ फोन, मिळतो दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप
Just Now!
X