Xiaomi कंपनीच्या Redmi Note 8 या स्मार्टफोनसाठी आज(दि.12) सेल आयोजित केला आहे. हा फोन म्हणजे Redmi 7 मालिकेची पुढील आवृत्ती आहे. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मागील बाजूला एकूण चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. आज(दि.12) दुपारी १२ वाजेपासून अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळासह mi.com आणि Mi होम स्टोअर्सद्वारे फोन खरेदी करता येईल.

ऑफर –
सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफर्सही आहेत. एअरटेलच्या ग्राहकांनी Mi.com संकेतस्थळावरुन हा फोन खरेदी केल्यास 1120 GB 4G डेटा वापरायला मिळेल. तसंच, एअरटेलच्या ग्राहकांना अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर 249 रुपये आणि 349 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये 10 महीन्यांपर्यंत डबल डेटा बेनिफिट मिळेल. याशिवाय अॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे खरेदी केल्यास 10% इंस्टंट डिस्काउंट, एचएसबीसी बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5% सवलत मिळेल.

कॅमेरा –
फोटोग्राफीसाठी यामध्ये मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल, तर अन्य कॅमेरे 8 मेगापिक्सल, दोन-दोन मेगापिक्सल क्षमतेचे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे. फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या बॅक पॅनलला आहे.

स्पेसिफिकेशन्स –
– डिस्प्ले – 6.39 इंचाचा डिस्प्ले (1080×2280 पिक्सल रेझोल्युशन)
– प्रोसेसर – स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर
– ऑपरेटिंग सिस्टिम – अँड्रॉइड 9 पाय बेस्ड MIUI 10
– बॅटरी – फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4000mAh क्षमतेची बॅटरी

किंमत –
रेडमी नोट 8 दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असून याच्या 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आणि 6जीबी रॅम+128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आहे.