News Flash

फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी खाताय? सावधान!

रोज खाओ अंडे!... पण ही घ्या काळजी

फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी खाताय? सावधान!
(प्रातिनिधिक छायाचित्र)

अंड्यांमधील अनेक घटक हे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. अंड्यातील पोषणमुल्ये आणि त्याच्यापासून पटकन कोणताही पदार्थ तयार करता येणे शक्य असल्यामुळे डॉक्टरांकडून नेहमीच आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. अंड्यातून मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात ती शरीराची ताकद वाढविण्यासाठीही उपयुक्त असतात. घाईच्या वेळीही कधी नाश्ता म्हणून तर कधी जेवणात पोळीसोबत अंडे खाता येते. असे हे वेळ वाचवणारे आणि आरोग्यदायी अंडे आहारात असावे असे डॉक्टरही खायला सांगतात. आठवडाभर असणाऱ्या धावपळीमुळे गृहीणी अनेकदा एकाचवेळी अंडी आणून ठेवतात. ही अंडी फ्रिजमध्ये जास्तवेळ साठवून ठेवली जातात. ही अंडी फ्रिजमध्ये ठेवल्याने चांगली राहतात असे आपल्याला वाटते खरे. मात्र अशाप्रकारे फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी वैज्ञानिकांच्या मते आरोग्यासाठी धोकादायक असतात.

अंडी रुममधील सामान्य तापमानात साधारण ७ ते १० दिवस चांगली राहू शकतात. तर फ्रिजमधील अंडी ३० ते ४० दिवस चांगली राहतात. मात्र त्यातील स्वाद, ताजेपणा, चव पोषकद्रव्ये निघून जातात आणि त्याचा शरीराला काहीच उपयोग होत नाही. फ्रिजमध्ये अंडी ठेवल्याने ती जास्त थंड होतात. त्यामुळे त्यातील पोषक द्रव्ये निघून जातात. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी अंड्यातून मिळणारी पोषकद्रव्ये निघून जातात.

फ्रीजमध्ये जास्तकाळ अंडी ठेवल्यास त्यावर बॅक्टीरिया होऊ शकतो. अंड्यावरील बॅक्टीरिया फ्रीजमधील इतर पदार्थ किंवा भाज्यांनावर जाऊन आपल्या शरीरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फ्रीजमध्ये जास्तवेळ साठवलेली अंडी खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 4:14 pm

Web Title: you dont need to eat refrigerated eggs nck 90
Next Stories
1 Realme चे अजून दोन फोन झाले महाग, कंपनीने वाढवली किंमत
2 पब्जीपासून ट्रू-कॉलरपर्यंत, 53 अ‍ॅप्स चोरी करतायेत तुमचा डेटा; बघा संपूर्ण लिस्ट
3 पावसात भिजण्याचा आनंद घेतल्यानंतर ‘ही’ पाच कामं केलीत तर राहाल ठणठणीत
Just Now!
X