आरती सोहोनी – response.lokprabha@expressindia.com
वाचक लेखक
आम्ही लहान असताना खरं सांगायचं तर यूट्यूबचाच काय, कोणत्याही ट्यूबचा जन्म झाला नव्हता. बहुतेक मलम, पावडर काचेच्या बाटलीतून किंवा पत्र्याच्या डब्यांमधून मिळत होती. प्लॅस्टिकचाही शोध लागला नव्हता. लवकरच दाताच्या पावडर किंवा मंजनाऐवजी टूथपेस्ट वापरली जाऊ लागली. आजही बिनाका टुथपेस्ट म्हटलं की त्या मागोमाग अमिन सयानी आणि बिनाका गीतमाला आठवते. एक पाण्याची रबरी लांबलचक टय़ूब मात्र आठवते.

नंतर बल्बची जागाही ट्यूबने घेतली आणि घरोघरी ट्यूब वापरणं हायफाय समजलं जाऊ लागलं. ट्यूबचा प्रकाश कसा पांढराशुभ्र. नंतर गोल लहान उभी लांबट अशा ट्यूब्ज मिळायला लागल्या. आता मलमही ट्यूबमध्ये मेकअपची लोशन्स्ही ट्यूबमध्ये, हेअर डायही ट्यूबमध्ये. कहर म्हणजे बेबीपण टेस्ट ट्यूबमध्ये. एखाद्या वस्तूला किंवा शब्दाला कसं आणि के व्हा महत्त्व येईल हे सांगता येत नाही.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
Loksatta Lokrang Picture Painting Tourist places the sea
चित्रास कारण की: समुद्रसरडा
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?

सगळ्यात खरी मजा मला वाटते ती यू ट्यूबची. यू ट्यूब हे नाव कसं आणि कोणी पाडलं, हे माहीत नाही. पण आता सगळ्यांची आवडती ट्यूब म्हणजे यू ट्यूब झालीये. यू ट्यूब म्हणजे जणू एक एन्सायक्लोपीडिया झाली आहे. काय वाट्टेल ते सर्च करा. दोन मिनिटात हजर.

पूर्वी एखादा नवीन पदार्थ हवा असला तर मासिकात वाचायचा, नाहीतर एखाद्या शेजारणीला किंवा एखाद्या काकी-मावशीला विचारायचा. प्रमाण कमी जास्त होईल का याचीही काळजी असायची.

पण आजकालच्या मुली आधीच बिनधास्त. त्या यू ट्यूबशी घट्ट मैत्री करतात. आपण म्हटलं, ‘‘हे अमूक तमूक कसं करायचं विचारलं पाहिजे बाई कोणाला तरी..’’

लगेच मुलगी किंवा सून म्हणते, ‘थांबा, मी यू ट्यूबवर बघते.’’ झालं.. यू ट्यूब मोबाइलमधून निघालीही. कोणत्या भाज्या, किती तेल, इतर कोणते पदार्थ वापरायचे आणि सगळ्याचा ‘आखों देखाँ हाल’ दोन मिनिटांत रेसिपी बघून. ‘‘सोप्पं आहे की नाही आई? त्याच्यात दिसतंय तसं करून दोन मिनिटांत होईल तय्यार.’’

आधीची आजी अंगाई किंवा बडबड गीत म्हणून झोपवायची. पण मधल्या काळातली बाई नोकरीला घराबाहेर पडली. अंगाई म्हणायला वेळ कुठे आहे. शिवाय नोकरीवर जाताना बाळ पाळणाघरात.

पण आता? सुनेच्या तोंडून अंगाई गीत ऐकून मी थक्कच झाले. एवढय़ा जुन्या ओव्या नि बडबड गीतं!

मी आश्चर्याने म्हटलं, ‘‘बरंच कांही येतंय गं तुला. आजीने शिकवले का?’’ लगेच उत्तर तयार.. नाही हो आई यू ट्यूबवरून शिकले.

संध्याकाळी साधारणपणे लहान मुलं घरात आल्यावर रामरक्षा, मारुती स्तोत्र, शुभंम् करोती वगैरे म्हटलं जातं. हेही आमच्या घरात ऐकू यायला लागलं. आता माझ्या लक्षात आलं हा यू ट्यूबचा वरदहस्त असणार!

नवीन पिढीची गाणी, बजावणी राहू देत, पण अशा जुन्या गोष्टी आणि संस्कृती जपल्याबद्दल तिचे आभार कसे मानावे कळत नाही. धन्य आहे हो या यू ट्यूबची!

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमरर्दिनी म्हणण्याऐवजी जयदेवी जयदेवी यू ट्यूब देवी..

सुनेला काय आता सासूबिसूची भीती? अहं सोडूनच द्या. ती विचारते. ‘आई येताय ना?’ ‘थांब गं जरा, एवढी सीरियल बघून येते.’ ‘अहो, आई राहू द्या. तीच सीरियल मी आल्यावर यू ट्यूबवर दाखवते. चला पटकन्.’ मग मला काही सुचतच नाही. ‘चल बापडे येते.’

आवडती जुनी गाणी, भावगीतं सून डाऊनलोड करून कसं कसं उघडायचं दाखवते. ‘आम्ही नसताना तुम्हाला याच्यावर नाटकं, सिनेमा, सगळं बघता येईल. दाखवू?’ हो म्हणायच्या आत यू ट्यूबवर ते लावण्यासाठी तिने भराभर बोट फिरवलीही. सगळा आनंदीआनंद.

संक्रांतीला नऊवारी कशी नेसायची यू ट्यूब दाखवते. पाचवारी दाखवते. हेअर स्टाईल दाखवते.

कोणते दागिने कसे दिसतात ते बघून ‘आई उद्या ऑनलाइन मागवू या का?’ असं विचारलं की  मलाच कोणीतरी हलवल्यासारखे वाटले.

पण मजा. आता सुनेच्या ट्रेनिंगखाली मीही यू ट्यूबवर गेलेल्या रेसिपिज्, कार्यक्रम, आवडती नाटय़ संगीत काय म्हणू नका सगळं एन्जॉय करायला शिकलेय. न शिकून सांगतेय कोणाला? धडपडत पुढे जाण्यापेक्षा यू टर्न घ्यावा.

अमेरिकेत काढलेले फोटो तिने मला क्षणात दाखवले. मी आधीच डाऊनलोड केले होते. ते बघेपर्यंत ती कसली गप्प बसतेय? व्हॉट्सअ‍ॅपवर फटाफट बोटं फिरवून सगळे मेसेजेस बघून मला म्हणाली, ‘झालं आई, हो ग बाई, फार छान आलेत.’

उद्या ‘आई मी यूट्यूबवर बाळासाठी मऊ भात करायला शिकणार आहे’ असं नाही म्हटलं म्हणजे मिळवली हो. किंवा पाटपाणी कसं घ्यायचं, कुठे काय वाढायचं हेही कदाचित यू ट्यूब दाखवेल.

आता सासू नको नि सारख्या सूचना नकोत. आता सासूची जागा आईने आणि सूचनांची जागा यू ट्यूबने घेतलीय. आम्ही दोघी मुलगा येईस्तो मस्त एन्जॉय करतो. तिच्या कानात सतत इयरफोन अडकवलेला असतो. अर्थात मी काय करणार? माझ्याही हातात मोबाइल आणि अर्थात यू ट्यूब!
सौजन्य – लोकप्रभा