iPhone 13 च्या लाँचनंतर आयफोन १२ वर १४ हजारांची सूट; जाणून घ्या नवी किंमत

आता आयफोन १२ हा १४,००० रुपयांच्या डिस्काउंटवर तुम्हाला खरेदी करता येणार आहे.

lifestyle
१४,००० रुपयांच्या डिस्काउंटवर तुम्हाला आयफोन 12 खरेदी करता येणार आहे.

कंपनीने इन्व्हेंटमध्ये लॉंच केलेली आयफोन १३ सिरिजचे चार वेगवेगळे मॉडेल तुम्हाला विकत घेता येणार आहे. तसेच अॅपलने नवीन आयफोन १३ ची किंमत मागील वर्षी लॉंच केलेल्या आयफोन १२ च्या लॉंच किंमती इतकीच ठेवली आहे. हा नवीन आयफोन लॉंच झाल्यानंतर आयफोन १२ ची किंमत कमी करण्यात आली आहे. विशेषत: आयफोन १२ सिरिज स्मार्टफोन खरेदी करत असाल तर तुम्हाला एक उत्तम संधी मिळत आहे. चला तर जाणून घेऊयात आता तुम्हाला आयफोन १२ (iPhone 12) किती स्वस्त किंमतीत खरेदी करता येणार आहे.

आयफोन १२ ची नवीन किंमत

नेहमी आपण पाहतो अनेक वेळा की, ई-कॉमर्स वेबसाईडद्वारे ऑफर मध्ये नवीन स्मार्टफोन कमी किंमतीत विकत घेता येतो. मात्र आता अॅपल कंपनीने अधिकृत रित्या आयफोन १२ ची किंमत ही कमी केलेली आहे.  आता आयफोन १२ हा १४,००० रुपयांच्या डिस्काउंटवर तुम्हाला खरेदी करता येणार आहे. दरम्यान या स्टँडर्ड मॉडलला गेल्यावर्षी कंपनीने ७९ हजार ९०० रुपयात लाँच करण्यात आले होते. आता या आयफोन १२ च्या ६४ जीबी स्टोरेजच्या फोनला तुम्ही ६५ हजार ९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसोबत खरेदी करू शकता. यासोबतच याला ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वरून खरेदी केल्यास या स्मार्टफोनवर १३ हजार रुपयांची सूट आणि काही त्वरित डिस्काउंट मिळू शकतील.

आयफोन १२ चे १२८ जीबी मॉडेल ८४,९०० रुपये या किंमतीत लॉंच केला होता. मात्र आता हा फोन तुम्ही ७०, ९०० रुपयांच्या सवलतीच्या किंमतीत खरेदी करू शकता. आयफोन १२ चे हाय-एंड २५६ जीबी वेरिएंट तुम्ही आता ८०,९०० या स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. या आधी या फोनची किंमत ९४, ९०० रुपये इतकी होती. आयफोन १२ मिनी ला आता तुम्ही ५९ हजार ९०० रुपयात खरेदी करू शकता. हा आधी फोन ६९ हजार ९०० रुपयात उपलब्ध होता. याचा अर्थ अॅपल कंपनीने किंमतीत १० हजार रुपयांची कपात केली आहे. डिव्हाइस एक कॉम्पॅक्ट ५१४ इंचाचा ओलेड सुपर रेटिना डिस्प्ले देते. हे ४के व्हिडीओ सुद्धा रेकॉर्ड करू शकते. यात A14 बायोनिक प्रोसेसर दिले आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 14000 discount on iphone 12 after the launch of iphone 13 learn the new price scsm

ताज्या बातम्या