शरीराला स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण रोज साबण वापरतो. साबणाने अंघोळ केल्याने ताजेतवाने तर वाटतेच पण यासोबत तुमच्या शरीराला एक चांगला सुगंध देखील येतो. पण तुम्हला माहित आहे का, साबणाचे इतरही अनेक फायदे आहेत, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. यात हल्ली बॉडीवॉश आणि हँडवॉशच्या वाढत्या वापरामुळे साबणाच वापर तितकासा होत नाही, पण हाच साबण जर तुम्ही कपाटात ठेवलात तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला मिळू शकतात. हे फायदे नेमके काय आहेत जाणून घेऊ..

कपाटात साबण ठेवण्याचे फायदे

कपड्यांच्या कपाटात अंघोळीच्या साबणाची वडी ठेवल्याने कपड्यांना चांगला सुगंध येतो. याशिवाय कपड्यांना बुरशी येण्याचा धोकाही कमी असतो. हा साबण अंडरगारमेंट्सच्या ड्रॉवरमध्ये ठेवा. पावसाळ्यात कपाटात एकप्रकारे ओलावा जाणवतो, अशावेळी साबण कपाटात ठेवल्यास तो वितळू तुमच्या कपाटातील ओलावा कमी करण्यास मदत करु शकतो.

कपाटात साबण नेहमी जाळीच्या सुती कापडात गुंडाळून ठेवावा. असे केल्याने साबण ओलसरपणामुळे वितळला तरी कपाट खराब होणार नाही.

चपलांच्या रॅकमध्ये ठेवण्याचे फायदे

बहुतेक लोकांच्या शूज किंवा चपलांमधून खूप दुर्गंधी येते. शिवाय घरातच चपलांचे रॅक ठेवल्यास संपूर्ण घरात ती दुर्गंधी पसरते. अशा परिस्थितीत साबण जाळीदार कपड्यात गुंडाळून रॅकवर ठेवा, असे केल्यास काही मिनिटांतच साबण सर्व वास शोषून घेईल .

साबणाचे इतर फायदे

कीटक चावल्यावर साबण लावल्याने वेदना आणि जळजळ कमी होते. कारण साबण एकप्रकारे अँटीसेप्टिक म्हणून काम करते. यामुळे वेदनेपासून आराम मिळतो.

रुम फ्रेशनरचे करेल काम

तुम्ही साबणापासूनही रुम फ्रेशनर बनवू शकता. याशिवाय जेव्हा झाडाला कीटकांचा प्रादुर्भाव होतो तेव्हा साबण फवारणी प्रभावी ठरते. तसेच तुम्ही साबणापासून हात धुण्याचे लिक्विड तयार करू शकता.