स्वयंपाक करताना अनेकदा महिलांची खूप घाई होते. यावेळी एका छोट्या चुकीमुळे संपूर्ण पदार्थ खराब होतो. त्यामुळे चव आणि रंगावर परिणाम होतो. ऑफिस किंव कामाला जाणाऱ्या महिलांची जेवण बनवताना रोज तारेवरची कसरत असते. ऑफिसल्या वेळेवर पोहचण्याच्या घाईगडबडीत अनेकदा पदार्थमध्ये मसाला, मीठसह काही गोष्टी जास्त पडतात. यामुळे असे पदार्थ कुटुंबातील सदस्यांना अजिबात खाण्याची इच्छा होत नाही. यामुळे रोजच्या घाईगडबडीत झटपट जेवण कसे बनवायचे हे गृहिणींना समजत नाही. यासाठी आम्ही तुम्हाला झटपट स्वयंपाक बनवण्याच्या सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. या ट्रिक्स काय आहेत जाणून घेऊ…
१) ग्रेव्ही मसाला तयार करुन ठेवा
तुम्हाला मसालेदार पदार्थ बनवायचे असतील तर तुम्ही कांदा, लसूण आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवून ठेवा. अनकेदा घाईघाईत ग्रेव्हीसाठी मसाले बारीक करत नाही यामुळे भाजी चविष्ट होत नाही. पण पटकन भाजी बनवण्यासाठी टोमॅटो, कांदे, लसून, आले आणि मिरची बारीक कापून घ्या. यानंतर तेलात तळून ते एअर टाईट टिफिमध्ये पॅक करुन दोन आठवडे फ्रीजमध्ये ठेवा. हे मसालेदार ग्रेव्ही बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल.
२) कुकरमध्ये तांदूळ चिकट होऊ नये म्हणून काय करावे?
घाई- घाईत बिर्याणी किंवा पुलाव बनवायला घेतो पण अनेकदा भात खूप चिकट होतो, अशावेळी तांदळाचा चिकटपणा कमी करण्यासाठी कुकरचे झाकण बंद करण्यापूर्वी त्यात दोन चमचे लिंबाचा रस टाका. यामुळे तांदूळ चिकट देणार नाही आणि पुलाव मऊ होईल.
३) पीठ जास्त काळ मऊ कसे ठेवायचे
पीठ मळल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यास ते कडक होते. त्यामुळे चपात्या कडक आणि काळ्या होतात. यावेळी पीठ पाणी आणि तेल लावून व्यवस्थित मळून घ्या आणि पॅकबंद डब्ब्यात ठेवा. यावेळी पीठ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही मऊ राहते आणि चपात्या काळ्या होत नाहीत.
४) पुरी खुसखुशीत कशी बनवायची
पुरी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनवायची असेल तर पीठ मळताना त्यात दोन चमचे रवा घाला. यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतील आणि जेवणालाही चव येईल.
५) डाळ पटकन बनवण्याची पद्धत
डाळ किंवा वरण झटपट बनवण्यासाठी कुकर लावतानाच डाळीच्या डब्ब्यात मिरची, जिरे, कांदा टोमॅटो, हळद टाका. जेणेकरुन डाळ उकडल्यानंतर फोडणीला देताना जास्त वेळ लागणार नाही.