Malaika Arora Inspired Kathi Yoga: वयाच्या ४९ व्या वर्षीही आपल्या फिटनेससाठी ओळखली जाणारी मलायका अरोरा हिच्या व्यायामाच्या रुटीन विषयी अनेकांना कुतूहल आहे. मलायकाने याआधी आपल्या आहाराविषयी व योगाच्या ट्रिक्सविषयी अनेकदा सोशल मीडियावर माहिती दिली आहे, मात्र आज मलायकाच्या योगा पोज पाहता आपल्यासारख्या सामन्यांना त्या जमतील का हा पहिला प्रश्न पडतो. मात्र आज आपण मलायकाच्या अगदी सोप्या व सहज घरी करता येतील अशा योगा रुटीनची माहिती घेणार आहोत. सेलिब्रिटीचा व्यायाम म्हणजे कपड्यांपासून उपकरणांपर्यंत दहा व्याप असतात असे वाटू शकतेच पण मलायकाचा हा योगा आपण घरातील कपडे वाळत घालायची काठी घेऊनही करू शकता.

अलीकडेच मलायकाने एक व्हिडीओ शेअर करून आपल्या काठी योगाविषयी माहिती दिली आहे. यात मलायका एक बांबू घेऊन योगा करताना दिसत आहे. मलायकाचे हे योगा रुटीन वजन कमी करण्यासाठी व विशेषतः कंबरेच्या बाजूचे, पोटाचे व ओटीपोटाचे फॅट्स कमी होण्यात मदत होऊ शकते. मलायकाप्रमाणेच बेली फॅट कमी करण्यासाठी काठी योगा कसा करावा हे पाहुयात…

आपण व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मलायका सुरुवातीला हातात काठी घेते व हात कानापासून वर उचलते. यावेळी पाय विश्राम स्थितीत असावेत. यानंतर आपण उठाबश्या काढतात त्याप्रमाणे खाली अर्ध्यावर बसावे. या पोझिशनला Squat असे म्हणतात. शरीराचा तोल सांभाळून आपण ही योगा पोजिशन एक पाय वर उचलूनही करू शकता, यानंतर हात खाली घेऊन काठी पुन्हा जमिनीवर ठेवा. यामुळे ओटीपोटाचे फॅट्स कमी होण्यास मदत होते.

मलायका अरोरा योगा व्हिडीओ

काठी योगाचे फायदे काय आहेत?

  • ओटीपोटाचे व कंबरेचे फॅट्स कमी करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो.
  • हातापायांच्या मांसपेशींमध्ये लवचिकता येण्यास मदत होते.
  • यामुळे पाठीच्या कण्याला लवचिकता येते.

चहा कॉफीतील साखर चालेल पण मधुमेह व अतिवजन असल्यास ‘हे’ गैरसमज टाळाच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • शरीरात रक्तप्रवाह वाढल्याने मूड आनंदी राहण्यास मदत होते.
  • divayoga.com च्या माहितीनुसार, या योगामुळे श्वसनात नियमितता येण्यास मदत होते.

(टीप- वरील लेख हा माहितीपर आहे, आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून व्यायाम कसा करावा याचे निर्णय घ्या)