Kiran Bedi Healthy Lifestyle : किरण बेदी हे एक असं नाव आहे जे कित्येकांना प्रेरित करणारे आहे. भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्या ७४ वर्षांच्या आहेत, तरीसुद्धा त्या तितक्याच फिट आहेत. किरण बेदींचा फिटनेस मंत्र काय आहे, तुम्हाला माहिती आहे का? एका युट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत किरण बेदी सांगतात की, त्यांनी आजवर कधीही समोसा, कचोरी खाल्ली नाही. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण, हे खरं आहे. त्यांनी या मागील कारणसुद्धा सांगितले. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊया.

किरण बेदी नियमित मेडिटेशन आणि योगा करतात, यामुळे त्या नेहमी फिट असतात. त्या नेहमी हेल्दी डाएट घेण्याचा प्रयत्न करतात. त्या त्यांच्या डाएटविषयी इतक्या शिस्तप्रिय आहेत की, त्यांनी कधीही समोसा, कचोरी आणि पकोडेसुद्धा खाल्ले नाही.
त्या सांगतात, ” जेव्हा मला पाणी पुरी खायची इच्छा होते, तेव्हा मी कांजी बनवून पिते; पण कधीही अशा पदार्थांचे सेवन करत नाही, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.”
किरण बेदी पुढे सांगतात की, त्यांना पायी चालायला आवडते. ज्या दिवशी त्या पायी चालल्या नाही, त्या दिवशी त्या एक वेळचे जेवण करत नाही.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’च्या चारूला ४१ व्या वर्षीच आला मेनोपॉज; मासिक पाळी लवकर बंद होण्याची कारणे काय?

मूड सतत बदलणे हा मानवी स्वभाव आहे. जेव्हा किरण बेदी यांचा मूड चांगला नसतो तेव्हा त्या स्वत:ला खूप वेळ देतात आणि स्वत:शीच संवाद साधतात.
तिशी किंवा चाळिशीत असणाऱ्या लोकांना त्यांनी सल्ला दिला आहे. त्या म्हणतात, “वयाच्या तिशीत असताना चुकीच्या ठिकाणी आपली एनर्जी वाया घालवू नका आणि आपल्या आयुष्याला योग्य मार्गावर आणा आणि मनाप्रमाणे वागा. चाळिशीत असणाऱ्या लोकांना मात्र त्या म्हणतात, “तुमच्यासाठी जबाबदारी निभावण्याचा हा काळ असतो. आपली जबाबदारी पार पाडा.”

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)