Yoga For Hair Growth: उन्हाळा आला की सतत घामामुळे केस चिकट होतात, ही तुमचीच नाही आपल्या सगळ्यांचीच समस्या आहे. पण तुम्हाला माहित आहे का? वारंवार स्वच्छता किंवा पूर्णच अस्वच्छता सुद्धा केसासाठी घातक ठरू शकते. यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सौम्य शाम्पूने केस नीट धुवायला हवेत. केस धुताना जोरात एकमेकांवर घासणे टाळा कारण यामुळे तुमच्या डोक्यावरील त्वचा सैल होऊ शकते आणि केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात. अक्षर योग केंद्राचे संस्थापक, हिमालयन सिद्धा अक्षर, यांनी अलीकडेच हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, केसावर ताण येईल असा वॉश घेण्याऐवजी कूलिंग एजंट असलेल्या हर्बल तेलांचा वापर करून स्वतःला हलक्या हाताने मसाज केल्यास सुद्धा फायदा होऊ शकतो. याच मुलाखतीत अक्षर यांनी काही सोपी व सहन करता येण्यासारखी योगासने सुद्धा सुचवली आहेत ज्याचा आपल्या केसाच्या वाढीस फायदा होऊ शकतो. ही आसने कशी करायची व त्याचा काय फायदा होईल, हे पाहूया..

केसाच्या भरभर वाढीसाठी करून पाहा ‘ही’ आसने

अधो मुख श्वानासन: हे आसन टाळूमध्ये रक्त पोहोचण्यासाठी मदत करते, ज्यामुळे केसांच्या कूपांचे पोषण होऊ शकते. हात आणि गुडघ्यावर ओणवे राहून आसनाची सुरुवात करा, नंतर तुमचे नितंब वर उचला, तुमचे पाय सरळ करा आणि उलटा V आकार तयार करा. पाठीचा कणा ताणून आणि डोके व मान सैल सोडण्याचा प्रयत्न करा. दरम्यान लक्ष श्वासावर असुद्या

Mumbaikars suffer from sore throat due to rising temperature
वाढत्या तापमानामुळे मुंबईकर घसादुखीने हैराण
water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

पदहस्तासन (स्टँडिंग फॉरवर्ड बेंड): पदहस्तासनामुळे टाळूमध्ये रक्त प्रवाह वाढून आणि पाठीचा कणा आणि हॅमस्ट्रिंग्ससह शरीराच्या मागील भागाला स्ट्रेच मिळतो. आपल्याला ओणवं उभं राहायचं आहे. हाताने पायाच्या पोटऱ्या पकडण्याचा प्रयत्न करा, गुडघे वाकवू नका. मान सैल सोडा.

सर्वांगासन: सर्वांगासनाने थायरॉईड ग्रंथी उत्तेजित होऊन हार्मोन्स वर नियंत्रण मिळवता येते. रक्ताभिसरण सुधारल्याने टाळूला पुरेसा रक्त व ऑक्सिजन पुरवता होऊ लागतो. यासाठी सर्वात तुमच्या पाठीवर झोपा आणि तुमचे पाय वर उचला, तुमच्या पाठीला हातांनी आधार द्या. पाय आपल्याला ९० अंशात वर उचलायचे आहेत. सुरुवातीला मानेवर जास्त ताण येणार नाही याची खात्री करा.

वज्रासन: वज्रासन हे पचन सुधारण्यासाठी आणि तणाव कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे केसांच्या आरोग्यास अप्रत्यक्षपणे फायदा होतो. पाय दुमडून नितंब आपल्या टाचांवर आणि हात आपल्या मांडीवर ठेवून जमिनीवर ताठ बसा आणि दीर्घ श्वास घ्या

मत्स्यासन (फिश पोझ): मत्स्यासन करताना मान आणि घसा ताणला जातो, थायरॉईड ग्रंथी उत्तेजित होतात व डोक्यात रक्त परिसंचरण सुधारते. आपले पाय लांब करून आणि हात आपल्या बाजूला ठेवून आपल्या पाठीवर झोपा. छाती वरच्या बाजूने उचलण्यासाठी मान व नितंबाचा आधार घ्या. आपण पद्मासनासारखे पाय दुमडून हातांनी अंगठे सुद्धा पकडून हे आसन करू शकता.

भुजंगासन (कोब्रा पोझ): भुजंगासन केल्याने पाठीचा कणा आणि छातीला स्ट्रेच मिळतो, ओटीपोटाजवळील अवयव उत्तेजित होतात व ताण- तणाव कमी होण्यास मदत होते. यासाठी आधी पोटावर झोपा. पाय ताठ राहू द्या. हात छातीच्या समांतर आणून तळवे खाली ठेवून कंबरेपासून वरच्या बाजूला वाकण्याचा प्रयत्न करा. मान यामध्ये घसा ताणला जातो त्यामुळे वर जाताना श्वास घ्या, खाली येताना हळू हळू सोडा.

बालयम मुद्रा: बालयम योगामध्ये दोन्ही हातांच्या नखांना एकत्र घासायचे असते. यामुळे टाळूमध्ये रक्त प्रवाह वाढवून केसांच्या वाढीस मदत होते असे मानले जाते. दररोज ५ ते १० मिनिटे नखे एकमेकांवर घासून तुम्ही हा प्रयत्न करू शकता.

कपालभाती प्राणायाम: कपालभाती प्राणायाम हे एक श्वासोच्छवासाचे तंत्र आहे जे शरीर शुद्ध करण्यास आणि ऑक्सिजन वाढविण्यास मदत करते, ज्यामुळे केसांच्या आरोग्यासह संपूर्ण आरोग्यास फायदा होतो. ताठ बसा, दीर्घ श्वास घ्या आणि मग पोटातून श्वास बाहेर टाकण्याचा प्रयत्न करा. आपल्याला कमी श्वास अनेकदा बाहेर टाकायचा आहे ज्यामुळे पोटाचे स्नायू आकुंचन- प्रसरण पावू शकतील. सरावाने तुम्ही या व्यायामाचा अवधी वाढवू शकता.

हे ही वाचा<< एक ग्लास दूध रोज प्यायल्याने तुमच्या शरीराला फायदा होतोय की त्रास, कसे ओळखाल? शरीराचं कसं ऐकाल?

अक्षर योग केंद्राचे संस्थापक, हिमालयन सिद्धा अक्षर, यांनी असेही सांगितले की, “गिलोय, आवळा, मेथी इत्यादी पदार्थ केसांच्या वाढीस प्रोत्साहन देऊ शकतात. त्यामुळे तसेच केसांच्या वाढीसाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने असणारा संतुलित आहार सुद्धा महत्त्वाचा आहे. पुरेसे हायड्रेशन, तणावमुक्त जीवन व वेळोवेळी स्कॅल्प मसाज यामुळे सुद्धा केस भरभर वाढू शकतात.