Benefits Of Drinking One Glass Milk Everyday: दूध प्यायलास तरच धष्टपुष्ट होशील हे वाक्य लहानपणी सगळ्या मोठ्यांकडून आपणही ऐकलं असेल. आता पोषणासाठी आहाराचे अनेक पर्याय उपलब्ध असताना, आजही एकंदरीतच चांगलं आरोग्य कमावण्यासाठी दूध ही गुरुकिल्ली मानली जाते, याचं कारण तुम्हाला माहितेय का? आज आपण इंडियन एक्सस्प्रेसच्या लेखात उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी दिलेली दुधाच्या पोषणाची माहिती जाणून घेणार आहोत. अलीकडे नव्याने उद्भवलेल्या ऍलर्जी सुद्धा लक्षात घेता, फार काही नाही तर निदान तुमच्या रोजच्या दिनचर्येत एक ग्लास दुधाचा समावेश केल्यास तुमच्या शरीरावर काय प्रभाव पाहता येईल हे पाहूया.

दररोज एक ग्लास दुध प्यायल्यास शरीराला ‘लगेचच’ कसा फायदा होईल?

Benefits Of Eating Fish
तुम्ही रोज मासे खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
onion garlic diet
तुम्ही कांदा आणि लसूण खाणे सोडून दिल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होणार? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या…
Loksatta chaturang old age mental illness Psychiatrist
सांधा बदलताना: भान हरवलेल्यांचं भान!
Health Benefits of Lassi
तुम्ही उन्हाळ्यात रोज ताक किंवा लस्सी प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
hair, heat, summer,
Health Special: ग्रीष्मातल्या उन्हाचा केसांवर काय परिणाम होतो?
following low salt diet as it causes disruption to your sleep as well as weakens your bones read what expert said
अपुऱ्या मिठाच्या सेवनाचा तुमच्या झोपेवर होतो थेट परिणाम? रोज आहारात किती मीठ असावं? पाहा तज्ज्ञ काय सांगतात
lemonade with coconut water
रोज सकाळी लिंबासह नारळपाणी सेवनाने तुमच्या शरीरावर काय परिणाम होणार? एकदा समजून घ्या फायदे व तोटे
Blowing Nose Can Harm Ears And Throat How To Clear Congestion
नाक शिंकरल्याने ‘असा’ वाढू शकतो त्रास! बंद नाक मोकळे करण्यासाठी योग्य उपाय कोणते? तज्ज्ञांनी सांगितलं उत्तर

मजबूत हाडे आणि दात: दूध हे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा नैसर्गिक स्रोत आहे, मजबूत हाडे आणि दातांसाठी दुधाचे नियमित सेवन अत्यंत फायदेशीर सिद्ध होऊ शकते.

स्नायूंसाठी पॉवरहाऊस: दुधामधील प्रथिनांचे प्रमाण स्नायूंच्या वाढीमध्ये आणि दुरुस्तीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यामुळे दररोज एक ग्लास दुधाचे सेवन हे स्नायूंना बळकट करू शकते. व्यायाम करणाऱ्या किंवा स्नायूंचा आकार वाढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी दूध फायदेशीर ठरू शकते.

रोगप्रतिकारक शक्ती: दुधामध्ये शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. दुधातील व्हिटॅमिन बी 12 सारखं व्हिटॅमिन निरोगी रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आजारपणापासून तुमच्या शरीराचे संरक्षण करते.

हायड्रेशन: शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आवश्यक द्रवपदार्थांच्या सेवनात दुधाची जोड दिल्याने पोषणासह हायड्रेटेड राहण्यास सुद्धा मदत होऊ शकते.

आजाराचा धोका कमी करण्यासाठी: अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले होते की, नियमित दुधाचे सेवन केल्याने ऑस्टियोपोरोसिस (हाडे कमकुवत करणारी स्थिती) आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करण्यासाठी मदत होऊ शकते

आता एक महत्त्वाची बाब म्हणजे, दूध हे आरोग्यासाठी भरपूर फायदे देतं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल पण, सिंघवाल यांच्या माहितीनुसार काही विशिष्ट स्थितींमध्ये लोकांनी दुध पिण्याचे प्रमाण कमी ठेवायला हवे. या स्थिती कोणत्या हे पाहूया..

दूध किंवा साखर पचवणे कठीण जात असल्यास: काही लोकांच्या शरीरात दुधात आढळणारी साखर पचवण्यासाठी आवश्यक असलेल्या लॅक्टेज एन्झाइमची कमतरता असते. यामुळे दूध प्यायल्याने पोट फुगणे, गॅस आणि अतिसार यांसारखे त्रास होऊ शकतात.

दुधाची ऍलर्जी: काहींना दुधातील प्रथिनांचे पचन कठीण होऊ शकते ज्यामुळे पुरळ, अंगावर पित्ताच्या गाठी येणे असे त्रास होऊ शकतात.

सॅच्युरेटेड फॅट: दुधात सॅच्युरेटेड फॅट्स असतात, ज्या मुळात घातक नसल्या तरी जास्त प्रमाणात सेवन केल्याने हे फॅट्स हृदयविकारास कारणीभूत ठरू शकतात. ज्यांना अगोदरच हृदयविकारांची पार्श्वभूमी आहे किंवा शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल पातळी आहे त्यांनी जास्त फॅट्स असणारे दूध पिणे टाळावे.

हे ही वाचा<< चवळीच्या भाजीने थायरॉईड बरा होतो का? वजन कमी करताना चवळी किती फायद्याची, तज्ज्ञांची स्पष्ट माहिती, वाचा

रोजच्या पोषणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दूध तुम्हाला उत्तम जोड देऊ शकते. पण जशा तुम्ही दोन्ही बाजू पाहिल्यात त्यानुसार दूध पिताना प्रमाण आपल्या शरीरानुसार ठरवायला हवं. दुधाचे सेवन केल्यावर तुम्हाला पचण्यात काही त्रास होत असल्यास, डॉक्टर किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. ज्यांना हृदयाची समस्या आहे त्यांच्या कमी चरबीयुक्त किंवा स्किम दूध ही एक आरोग्यदायी निवड असू शकते. लक्षात ठेवा, संयम महत्वाचा आहे.