कंटाळवाणे वाटल्यास आपण चाहा पितो. याने थोड ताजतवाण वाटतं, मात्र ते अधिक पिऊ नये असा सल्ला देखील दिला जातो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास त्याचे दुष्परिणाम देखील होतात. चहाच्या बाबतीतही तेच सांगितले जाते. चहाचे अतिसेवन आरोग्याला धोकादायक ठरते, असे सांगितले जाते. मात्र, एका नव्या संशोधनातून चहा हे आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे सांगण्यात आले आहे.

चाहाचे अधिक सेवन केल्याने मृत्यूचा धोका कमी होतो?

युनायटेड किंग्डम येथील संशोधकांनी ब्लॅक टीचे विश्लेषण केले. यातून चाहाचे अधिक सेवन केल्याने मृत्यूचा धोका कमी होतो असे समजले आहे. डेटाचे विश्लेषण केले असता, जे लोक दोन ते तीन कप चहा घेतात त्यांना चहा न घेणाऱ्यांच्या तुलनेत मृत्यूचा धोका ९ आणि १३ टक्के कमी असतो.

(सणांच्या दिवसात जास्त जेवणे ठरू शकते नुकसानदायक; हे सोपे उपाय करून टाळा धोका)

हा अभ्यास युनायटेड किंग्डममधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचा एक भाग असलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी केला आहे. जे लोक दररोज दोन किंवा अधिक कप चहा घेतात त्यांना चहा न पिणाऱ्या लोकांपेक्षा कोणत्याही कारणामुळे मृत्यूचा धोका 9 ते 13 टक्के कमी असतो. तसेच, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, इस्केमिक हृदयरोग आणि स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी होण्याशी अति चहाच्या सेवनाचा संबंध असल्याचे एनआयएचने एका निवेदनात म्हटले आहे.

जर्नल अनल्स ऑफ इंटर्नल मेडिसीनमध्ये हा आभ्यास प्रसिद्ध झाला आहे. पुढे चहा जरी जगभरी घेतला जात असला तरी ज्या लोकसंख्येमध्ये काळ्या चहाचे प्रामुख्याने सेवन केले जाते तेथे मृत्यूच्या जोखमीशी चहाचा संबंध हा अनिर्णित असल्याचे सांगण्यात आले आहे.

(Vegan Eggs: शाकाहारी अंडी चिकन अंड्यांपेक्षा कशी वेगळी कशी आहेत? जाणून घ्या)

4 लाख 98 हजार 43 पुरुष आणि स्त्रिया या अभ्यासात सहभागी

40 ते 69 वर्षे वयोगटातील 4 लाख 98 हजार 43 पुरुष आणि स्त्रिया या अभ्यासात सहभागी झाले होते, त्यापैकी 89 टक्के लोकांनी काळ्या चहाचे सेवन केल्याचे सांगितले. या अभ्यासामध्ये 2006 ते 2010 दरम्यान एका प्रश्नावलीचे उत्तर देणे समाविष्ट होते, ज्याचा एका दशकाहून अधिक काळ पाठपुरावा करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहभागींना सुमारे 11 वर्षे फॉलो केले गेले आणि मृत्यूची माहिती यूके नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या लिंक केलेल्या डेटाबेसमधून आली. कॅफीन चयापचयातील अनुवांशिक भिन्नता लक्षात न घेता, दररोज 2 किंवा अधिक कप पिणार्‍यांमध्ये उच्च चहाचे सेवन कमी मृत्यूच्या जोखमीशी संबंधित होते. यातून अगदी उच्च पातळीच्या सेवनानंतरही चाहा हा निरोगी आहाराचा भाग असू शकतो, संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे. तसेच, चहाचे पसंतीचे तापमान, दूध किंवा साखरेचा वापर यांचा विचार न करता हा संबंध दिसून आल्याची नोंद एनआएचने केली आहे.