कोणताही सण असला की घरी वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, नैवेद्याचे पदार्थ, प्रसादासाठी गोड पदार्थ असे अनेक पदार्थ बनवले जातात. खवय्यांसाठी तर हा सणांचा काळ मेजवानीचा असतो. कारण या दिवसांमध्ये सगळीकडे चविष्ट पदार्थ अमर्यादित प्रमाणात खायला मिळतात. फक्त खवय्ये मंडळीच नाही तर अगदी रोज डायट करणारे देखील सणांच्या दिवसात डायट विसरून आवडीचे पदार्थ मनसोक्त खाताना दिसतात. या दिवसांमध्ये मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटी होतात आणि अशात त्यांच्या आग्रहास्तव दोन घास जास्तच खावे लागतात.

गणेशोत्सव झाल्यानंतर नवरात्री, दसरा, दिवाळी अशी एकापाठोपाठ एक सणांना सुरूवात झाली आहे. या दिवसांमध्ये आपले आरोग्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष होते. जास्त जेवल्याने त्याचा शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याला नुकसानदायक ठरणाऱ्या गोष्टी टाळणे आवश्यक असते. त्यासाठी काय उपाय करता येतील जाणून घेऊया.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

आणखी वाचा : मुलांच्या नाश्त्यात करा ‘या’ पदार्थांचा समावेश; सर्वांगीण विकासासाठी नक्की ठरेल फायदेशीर

जेवणाची वेळ पाळा
सणांच्या दिवसात आपल निश्चित रुटीन नसते. कुठे बाहेर जायचे असल्यास किंवा घरी नातेवाईक येणार असतील तर त्यानुसार जेवणाची वेळ ठरवली जाते. त्यामुळे जेवणाचे वेळापत्रक बिघडते आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काही वेळा आपण गरजेपेक्षा जास्त खातो आणि मग त्या दिवसात इतर काही खाणे टाळतो, असे करणे चुकीचे आहे. तज्ञांच्या मते निरोगी राहण्यासाठी जेवण वेळेवर करणे आवश्यक असते. आरोग्याला होणारे नुकसान टाळण्यासाठी जेवणाची वेळ पाळा.

जेवणात फायबर असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा
सणांच्या दिवसात जंक फूड आणि तळलेले अन्नपदार्थ खूप खाल्ले जातात. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाऊ शकते. याऐवजी मुबलक प्रमाणात फायबर असणाऱ्या पदार्थांचा जेवणामध्ये समावेश करावा. काकडी, गाजर, कडधान्य आणि हिरव्या पालेभाज्या फायबरचे चांगले स्त्रोत आहेत. फायबरयुक्त अन्न घेतल्याने लवकर भूक लागत नाही.

भरपूर पाणी प्या
पाणी प्यायल्याने गोड खाण्याची क्रेविंग कमी होते. निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसेच जास्त पाणी प्यायल्याने भूक लागत नाही आणि मॅटाबॉलिजम बुस्ट होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

आणखी वाचा : रात्रीच्या जेवणात ‘या’ पदार्थांचा समावेश चुकूनही करू नका; ठरतील आरोग्यास धोकादायक

पुरेशी झोप घ्या
झोप पुर्ण न झाल्यास जास्त भूक लागण्याची शक्यता असते. सणांच्या काळात सर्व तयारीच्या गडबडीमध्ये झोप पुर्ण होत नाही. अशावेळी जास्त भूक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)