‘या’ ४ राशीच्या मुली डॉमिनेटिंग मानल्या जातात, पती आणि कुटुंबावर चालतो त्यांचा हुकूम

प्रत्येक मुलीची इच्छा असते की लग्नानंतर तिला असा नवरा आणि सासर मिळावा, जे तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकेल. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार काही मुली स्वभावाने खूप डॉमिनेटिंग असतात. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या चार राशी?

zodiac-1-1

Zodiac Sign Prediction: प्रत्येक मुलीची इच्छा असते की लग्नानंतर तिला असा नवरा आणि सासर मिळावा, जे तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकेल. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार काही मुली स्वभावाने खूप डॉमिनेटिंग असतात. ती तिच्या नवऱ्यावर तसंच सासरच्यांवर खूप हुकूमत करते. लोकांनी तिचे ऐकले नाही तर ते त्यांना सहन होत नाही. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आणि ९ ग्रह सांगितले आहेत. ज्योतिषांच्या मते, व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याविषयी माहिती त्याच्या राशी आणि कुंडलीद्वारे मिळू शकते.

ज्योतिषशास्त्रात अशा चार राशींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामध्ये जन्मलेल्या मुलींना सर्वांवर राज्य करायचं असतं. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या चार राशी?

वृषभ : वृषभ राशीत जन्मलेल्या मुली खूप डॉमिनेटिंग असतात. या मुली सर्वांवर वर्चस्व गाजवतात. आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्या कोणतीही मर्यादा ओलांडण्याच्या प्रयत्नात असतात. या राशीत जन्मलेल्या मुली त्यांच्या लाइफपार्टनरबद्दल खूप पझेसिव्ह असतात. लग्नानंतर या मुली तिच्या नवऱ्यावर आणि सासरच्यांवर खूप राज्य करतात.

वृश्चिक : या राशीच्या मुली खूप हुशार मानल्या जातात. त्यांच्याकडे नेतृत्व क्षमताही चांगली आहे आणि त्यामुळे ते वर्चस्व गाजवत असतात. तथापि, या राशीच्या मुली त्यांचे नाते यशस्वी करण्यासाठी संपूर्ण आयुष्य देतात. या राशीत जन्मलेल्या मुली त्यांच्या नात्यात कोणचाही हस्तक्षेप सहन करू शकत नाहीत. या आपले स्वातंत्र्य उघडपणे उपभोगत असते.

कन्या : कन्या राशीच्या मुली खूप प्रॅक्टिकल असतात. तिला तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे चांगलं ठाऊक असतं. ते ज्यांना आवडतात त्यांच्यासाठीच ते खूप चांगले असतात. या राशीच्या मुलीही डॉमिनेटिंग असतात. मात्र, लग्नानंतर त्या आपल्या स्वभावाचा स्वतःवर जास्त परिणाम होऊ देत नाही. यामुळेच या राशीच्या मुलींना पती आणि सासरच्या लोकांकडून खूप प्रेम मिळतं.

कुंभ : कुंभ राशीच्या मुली आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात. त्यांच्यात भावनांवर नियंत्रण ठेवण्याची जबरदस्त क्षमता आहे. लग्नानंतर या मुली त्यांच्या नवऱ्यावर आणि सासरच्यांवर खूप राज्य करतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: According to astrology girls of these 4 zodiac sign considered to be dominating keep control over husband and family prp

Next Story
अकाली जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी हळद उपयोगी
ताज्या बातम्या