scorecardresearch

ज्योतिष शास्त्रानुसार ‘या’ चार राशीच्या मुली सासरच्यांसाठी भाग्यवान मानल्या जातात

कर्क राशीच्या मुली खूप भाग्यशाली मानल्या जातात. त्यांच्याकडे पैशाची आणि अन्नाची कमतरता

ज्योतिष शास्त्रानुसार ‘या’ चार राशीच्या मुली सासरच्यांसाठी भाग्यवान मानल्या जातात
कुंभ राशीच्या मुली खूप मेहनती असतात. त्यांना आयुष्यात जे काही मिळवायचे आहे ते त्या करतात. (photo: pixabay / indian express)


ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीच्या मुलींना त्यांच्या पती आणि कुटुंबातील सदस्यांसाठी भाग्यवान मानले जाते. ज्या घरात या राशीच्या मुली लग्न करून जातात त्या घरात पैसा आणि अन्नाची कमतरता नसते. तिला लक्ष्मीचे रूप मानले जाते. या राशीच्या मुली आपल्या पतींवर खूप प्रेम करणार्‍या असतात आणि त्यांच्या प्रत्येक छोट्या गरजांची काळजी घेतात. जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी.

कर्क राशी

कर्क राशीच्या मुली खूप भाग्यशाली मानल्या जातात. त्यांच्याकडे पैशाची आणि अन्नाची कमतरता नसते. त्या त्यांच्या पतीला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात आणि प्रत्येक परिस्थितीत त्याच्या पाठीशी उभ्या राहतात. त्यांच्या या प्रेमळ स्वभावाने तिच्या स्वभावाने सासरच्या माणसांचे मनं जिंकतात. त्यांच्या घरामध्ये सुख-समृद्धीची कमतरता नसते. त्यांना आयुष्यात खूप मान मिळतो.

मकर राशी

या राशीच्या मुलीही खूप भाग्यशाली मानल्या जातात. मकर राशीच्या मुली त्यांच्या पतीला सतत साथ देत असतात. त्यांच्या उपस्थितीमुळे सासरचे जीवन सुखसोयींनी भरलेले असते. त्यांना लक्ष्मीचे रूप मानले जाते. या मुली स्वभावाने अतिशय दयाळू असतात. त्या स्वतःला आनंदी ठेवतात तसेच त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही आनंदी ठेवतात.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या मुली खूप मेहनती असतात. त्यांना आयुष्यात जे काही मिळवायचे आहे ते त्या करतात. त्यांचे भाग्य खूप वेगवान आहे. त्या त्यांच्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून चालतात. लग्नानंतर पतीचे नशीब चमकते. एवढेच नाही तर त्यांच्या सासरच्या सर्व लोकांसाठी भाग्यवान असल्याचे सिद्ध होते. त्यांच्या उपस्थितीमुळे लोक प्रगती करू लागतात.

मीन राशी

या राशीच्या मुलींचा स्वभाव खूप चांगला असतो. ते त्यांच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण ठेवतात. तसेच लोकांना त्याच्याशी बोलायला आवडते. या राशीच्या मुलीशी लग्न केलेल्या मुलाचे नशीब चमकते. सासरच्या लोकांसाठी त्या खूप भाग्यवान मानल्या जातात. पतीकडूनही त्यांना खूप प्रेम मिळतं.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-10-2021 at 19:11 IST

संबंधित बातम्या